खासदार सुनील तटकरे युगंधर पुरस्काराने सन्मानित



  शिवरुद्र कराटे अकॅडमी व माध्यम प्रायोजकत्व लोकमत यांचा स्तुत्य उपक्रम


 युगंधर हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान होय... खासदार सुनील तटकरे

 श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

 जनतेची सेवा करणे हे माझं कर्तव्य आहे . चक्रीवादळाच्या रूपानं निसर्गाने आपलं रौद्र रूप आपणा सर्वांना दाखवलं. माझ्यासोबत सर्व प्रशासकीय यंत्रणेने प्रयत्नाची पराकाष्टा करून चक्रीवादळाच्या धक्क्यातून सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचे काम केले आहे. माझ्या आयुष्यात मला अनेक मानसन्मान पुरस्कार मिळाले च्या सर्व पुरस्कारांमध्ये आज श्रीवर्धनच्या जनतेकडून देण्यात आलेला युगंधर पुरस्कार हा सर्वोच्च मी मानतो असे सुनील तटकरे यांनी सांगितले. शिवरुद्र  कराटे अकॅडमी व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने  नगरपरिषद शाळा नंबर एक च्या सभागृहात आयोजित नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी तटकरे यांनी सांगितले. मी माझ्या आयुष्यात सामाजिक असेल व राजकीय असेल किंबहुना इतर कोणत्याही क्षेत्रात कधीही संकटांच्या समोर डगमगलो नाही मात्र तीन जूनला झालेल्या चक्रीवादळाने माझे मन अक्षरशः सुन्न झाले. चक्रीवादळात  गलितगात्र झालेल्या जनतेला सावरणे अगत्याचे होते. अशा कठीण प्रसंगी डोळ्यातील अश्रू पुसून सर्वसामान्यांचे जीवन पूर्ववत करण्यासाठी ठाम निश्चयाने चक्रीवादळाने बाधित झालेल्या सर्व क्षेत्रांमध्ये वाऱ्याच्या वेगाने संचार केला. सर्व भागाचे स्वतः पाहणी केली. ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेस मार्गदर्शन केलं काही ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे आदेश दिले. माझ्यासोबत  राज्य सरकार मध्ये कार्यरत असणाऱ्या विविध मंत्र्यांनी संपूर्ण रायगड मधील बाधित भागाचा दौरा केला.  राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी चक्रीवादळांनी बाधित झालेल्या जनतेशी संवाद साधला. गोरगरिबांच्या जखमांवर फुंकर घालण्याचं काम पवार साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलं.  सदर प्रसंगी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निधीची तरतूद करण्याची घोषणा केली. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून बाधित भागातील सर्व बाबींचा आढावा नित्यनियमाने घेतला गेला. राज्य सरकार कडून जनतेला जास्तीत जास्त निधी मिळावा या दृष्टिकोनातून कायद्याच्या विविध निकषांमध्ये बदल सुद्धा घडवून आणले. माझ्या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे. निसर्गाने उधवस्त केलेली,उघड्यावर पडलेली घरे, मोडलेला उध्वस्त झालेला जनतेचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी दिवस-रात्र एक केली . असे तटकरे यांनी सांगितले. आज शिवरुद्र कराटे अकॅडमी व माध्यम प्रायोजक लोकमत यांनी मी माझा केलेला सन्मान माझ्या आयुष्यातील माईलस्टोन ठरणार आहे. युगंधर या शब्दाची महती  मी जाणतो. आज विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांचा त्यांनी केलेल्या कार्याचा  गौरव याठिकाणी करण्यात आलेला आहे. प्रशासकीय व्यवस्थेने चक्रीवादळा मध्ये निश्चितच कौतुकास्पद कार्य केले. आज मला दिलीप कासारे व  सौ संध्या कासारे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले हे मी माझे भाग्य समजतो. कासारे दांपत्याने घेतलेला मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प निश्चितच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. आयुष्य जगत असताना समाजाच्या प्रती आपले कर्तव्य बजावत असताना कासारे दांपत्या  सारखे आदर्श डोळ्यासमोर उभे राहतात तेव्हा निश्चितच आयुष्याकडे बघण्याचा मानवी दृष्टिकोन बदलतो. शिवरुद्र कराटे अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रात व संपूर्ण देशात नावलौकिक मिळवतील असे उत्तम व आदर्श खेळाडू शैलेंद्र ठाकूर तयार करतील याचा मला विश्वास आहे  असे सुनील तटकरे यांनी सांगितले. सदरच्या नागरी सत्कार सोहळ्यात श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी,  नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण कुमार मोरे, पोलीस निरीक्षक  प्रमोद बाबर व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता श्रीकांत गणगणे व इतर विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून पत्रकार श्रीवर्धन मध्ये आले. सदरच्या नागरी सोहळ्यासाठी  श्रीवर्धन नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, नगरसेवक प्रीतम श्रीवर्धनकर,  नगरसेवक अनंत गुरव, ऍड राकेश पाटील लोकमतचे अलिबाग शाखा व्यवस्थापक समीर कुलकर्णी व शिवरुद्र कराटे अकॅडमी चे विद्यार्थी उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमामध्ये करोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा