"कोरोना योध्दा" म्हणून एस्.टी.चालक वाहकांसह कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोरोना लसीकरण करावे : प्रवासी संघटनांची मागणी
संजय खांबेटे : म्हसळा
राज्यात कोरोना लसीकरणाच्या दुसरा टप्पा १ मार्च पासून सुरू आहे.कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पोलीस दलातील कर्मचारी, महसूल विभाग व जिल्हा परिषदेच्या शिक्षक, अंगणवाडी सेविका, कर्मचाऱ्यांच्या समावेश करण्यात आला आहे. कोरोना योध्दा म्हणून या प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यांत येऊन त्यांचे लसीकरण सुद्धा करण्यात येत आहे त्याचप्रमाणे कोरोना काळात परराज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यापर्यंत सोडण्यासाठी विशेष एस. टी. बसची सुविधा देणाऱ्या "कोरोना योध्दा" म्हणून रायगड विभागातील एस्.टी.चालक वाहकांसह कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लसी- करण करावे अशी मागणी श्रीवर्धन -म्हसळा प्रवासी सघटनेचे अनिल महामुनकर यानी परिवहन मंत्री अनिल परब व रायगडच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्याकडे केली आहे.
"कोरोना काळात रायगड (पेण)विभागातील कर्जत,पेण,अलिबाग,मुरुड,रोहा,माणगाव, महाड, श्रीवर्धन या आठ आगारांतून लाॅकडा- ऊनमध्ये परप्रांतीय मजुरांना १५६० गाड्यांनी त्यांच्या मूळ गावी सुखरूप पोहचवले.कोरोना काळात सुमारे ६ महिने अँम्ब्युलन्सची वाहतू - क केल.माहे सप्टेंबर२०२० पासुन कोरोनाचे संक्रमण वाढू नये, म्हणून मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. प्रवाशांच्या सोयीसाठी लोकल सेवेला पर्याय म्हणून बेस्ट बसच्या माध्यमातून बसफेऱ्याद्वारे प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती. बेस्ट बसवर पडणारा ताण व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विविध आगारातून कर्मचारी मुंबई येथे सेवा बजावण्यासाठी गेले होते. याच कालावधीत वाहतुकीसाठी रायगड विभागातून ७० गाड्यांची मदत केली. रायगड विभागात एकुण कर्मचारी २३८० आहेत "
कोरोना कालावधीत राज्यातील अनेक शाळा बंद असतानाही सर्व शिक्षकांचा समावेश लसी करणासाठी प्राधान्याने करण्यात आला. शिक्षकांना दुसऱ्या टप्प्यात सामील केले गेले . शिक्षकांचे लसीकरण देखील सुरू झाले, त्याच प्रमाणे एसटी बसमध्ये चालक-वाहकांचा प्रत्येक प्रवाशांशी थेट संपर्क येत असूनही चालक वाहकाला लस दिली गेली नसल्याने लसीकरण संदर्भात नियोजन करणाऱ्या यंत्रणेने याबाबत तात्काळ विचार करून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना लस द्यावी, अशी मागणी थेट प्रवाशां कडून होत आहे.
"याच कालावधीत राज्यातील अनेक चालक वाहकाना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना घडल्या राज्यात कोरोना पुन्हा डोके वर करत असतानाच एस्.टी. च्या चालक वाहकांचा ५० लाखांचा विमा उतरविण्यात यावा"
अनिल महामुनकर , प्रवासी संघटना श्रीवर्धन -म्हसळा
Post a Comment