(म्हसळा -प्रतिनिधी)
रायगड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक नेवरूळ गावचे रहिवासी अमित महागावकर यांची पत्नी तथा नेवरूळ ग्राम पंचायतीच्या सरपंच आर्या अमित महागावकर यांचे आज शनिवार दिनांक १३ मार्च 2021 रोजी पहाटेच्या दरम्यान हृदय विकाराचा तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय अवघे 32 वर्षे होते.विवाह होऊन अवघे 8 वर्षे सुखाचा संसार चालु असताना नेवरूळ गावात लोकमतातून निवडून आलेल्या सरपंच आर्या महागावकर यांचा जीवन कार्यकाल औटघटकेचा ठरला त्या खुप प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या त्यांच्या अकस्मात निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचे पश्चात 6 वर्षाची मुलगी,पती,आई, वडील,सासु,सासरे आसा परिवार आहे.आर्या महागावकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्हा व तालुका शिक्षक संघटना,सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मंडळीनी त्यांचे निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेऊन शोक व्यक्त केला.
Post a Comment