तळा (किशोर पितळे)
हिंदु धर्मात हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा वर्षातील शेवटचा सण या सणाला अंत्यत महत्त्व आहे.आपल्या जीवनात भौतिक सुखाच्या मागे लागून अपप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालल्याअसून विशेषतःतरूणपिढींंमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला जात आहे आणि कायमचा राहिला असल्याचे पहायला मिळते धर्म संस्कार संस्कृती लोप पावली जात आहे. वडीलधारी मंडळीच्या धाक ठेवला नाही हे नीतीला धरून नाही. वाईटअपप्रवृत्तीचा नाश या हुताशनी पौर्णिमेला होळीत विसर्जन करणे असे आध्यात्म व पुराणात सांगितले आहे. आणी आजच्या समाजाला खरी गरज आहे. मोठ्या होळीला मोठमोठी झाडे तोडून होळीत जाळली जातात त्यामुळे जंगल संपत्तीचा र्हास होत आहे हि निसर्गाची मोठी हानी होते याची जाणीव नाही.सरकार वृक्ष लागवड व संगोपन करण्यासाठी मोठे उपक्रम राबवूनलागवड केली जाते. यामध्ये सामाजिक संस्था,शाळाकाँलेज प्रतिष्ठान मधून जनजागृती केली जाते.हे तेव्हड्या पुरतेच का?.. पर्यावरणच्या दुष्टीने विचार का करीत नाही.याचा समाज जीवनावर मोठा विपरीत परिणाम होत आहे हे विचारात घेतले जात नाही.एखाद्याचे चोरून पेंढे,गवत, सलदी होळीत टाकून जाळणे ही सद्यस्थितीत योग्य नाही. ही अपप्रवृत्ती बदलली गेली पाहिजे. काय योग्य काय अयोग्य याची जाणीव न राहील्याने तरुण पिढी भरकटत चालली आहे. याची विशेष पालकवर्गानी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. दुर्गुणा ची आहूती म्हणजे मनात साठलेला मळ, काम, क्रोध लोभ मोह मद मत्सर रूपी दुर्गुण होळीत व धुलीवंदनात आकाशात भिरकावून देऊनजीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण आहेपरंतुया रंगपंचमीचे बाजारीकरण झालेले जिकडे तिकडे पहायला मिळते.नैसर्गिक रंगाची ऊधळण थांबली आहे कृत्रिम रासायनिक रंग सर्वांच्याआरोग्याचा बेरंग करीत आहेत.सणानिमित्त परिधान केलेल्या कापडांची रंग उडवून वाट लागते. रंग लावूनचेहरा विद्रूप होत आहे. हे समाज विद्रोही विचार रसातळाला पोहोचणारे आहेत याचा विचार करणे ची नितांत गरज आहे. तरूणांमध्ये शिमगा सण साजरा करीतअसताना पोस्त मागण्याची मोठीवाईटअपप्रवृत्ती वाढीस लागली आहे लहान मोठ्या दुकानात,पादचारी, वाहन चालक,वाहनावर कलर उडवणे, त्यांच्या नावांनी बोंब मारणे एखाद्याचे नुकसान करणे या गोष्टी मोठ्या प्रमाणावर बळावल्या आहेत."तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"हे वै.वामनराव पै.यांनी आपल्या जीवनाचे महत्त्व आचार विचार कसे आसावेत याची जनजागृती केली आहे.ही गरज आहे.संपूर्ण जगावर कोरोना सारख्या महामारीची टांगती तलवार असूनही आजच्या परिस्थिती कसेराहीले पाहिजे याचे भान ठेवणे आवश्यक व गरजे असून पारंपरिक पद्धतीने साजरी होत असलेली होळी सण थोडक्यात साजरा करावा. शासकिय नियमाची पायमल्ली होणार नाही. याची काळजी घेणे गरजेचे आहे.हा सुविचार करून दुर्गुणांनाहोळीत राखरांगोळी करावी असे या निमित्ताने सुचीत करावेसे वाटते.
Post a Comment