तळा(किशोर पितळे)
तळा शहरातील राणेची वाडी (गोळे आळी) येथील गोळे बंधूंनी आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून तालुक्यातील प्रगत आदिवासी शेतकऱ्यांचा सन्मान तसेशेतकऱ्यांना शेतीच्या अवजारांचे वाटप केले.पंचमुखीमारुती मंदिरा समोर कै.नारायण भिकु गोळे यांच्या प्रथम पुण्य स्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे,कृषि अधिकारी सागर वाडकर,रितेश मुंढे,अमेय लोखंडे, स्वदेश फाउंडेशन व बळीराजा संघटनेचे सदस्य तसेच तालुक्यातील आदिवासी महिला व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कै.नारायण गोळे हे हाडाचे शेतकरी होते.आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन नोकरी करावी अथवा मोठ्या पदापर्यंत पोहचून नाव मोठे करावे असे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते. परंतु नारायण गोळे यांनी आपल्या मुलांनी प्रगत शेतकरी व्हावे म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले.हल्लीच्या युगात हातभर जागेसाठी देखीलभांडण होतअसल्याचे आपण नेहमी पाहतो मात्र नारायण गोळे यांनी पंचमुखी मारुती मंदिरासाठी स्वतःची जागा दान स्वरूपात दिली.त्यांच्या पश्चात त्यांची परंपरा त्यांच्या तिन्ही मुलांनी सुरू ठेवली आहे.वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणास सुरेखा पवार (शेनाटे आदिवासी वाडी),वसंत जाधव(वांजळोशी आदिवासी वाडी), गोपाळ हिलम(चरई आदिवासी वाडी) या तिन्ही प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान केला. तसेच शेणाटे,वांजळोशी,चरई,कडक्याची गाणी, खांबविली, आंबेळी आदी आदिवासी वाड्यांतील शेतकरी बांधवांना घमेल,फावडे,पिकाव यांसारख्या शेतीच्या अवजारांचे वाटप करण्यात आले.हा मोठा आदर्श समाजापुढे ठेवला असून इतरांनीही आशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचेसंदेश या माध्यमातून दिला आहे त्यांनी केले.गोळे बंधूंनी राबविलेल्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
Post a Comment