राम भोस्तेकर यांची माणगांव ग्राहक संरक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड.




किरण शिंदे / लोणेरे

 माणगाव १५ मार्च :- लोणेरे विभागातील पन्हंळघर बुद्रुक येथील ग्रांमपंचायतीचे उपसरपंच तथा पत्रकार राम भोस्तेकर यांची नुकतीच ग्राहक संरक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली असून भोस्तेकर यांच्यावर माणगांव तालुक्यातील विविध पक्षाच्या मान्यवर तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रांमस्थां कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  माणगांव तालुक्यात भोस्तेकर हे सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने तालुक्यातील अनेक संस्थाशी त्यांचे जवळचे सबंध अाहेत. हे महाराष्ट्र राज्य लोककल्याण  ग्राहक संरक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनकर आमकर, सरचिटणीस प्रशांत हिंगणे यांनी जाणून  उपभोक्ता संरक्षण कल्याण अधिकार अधिनियम १९८६ /२०१९ प्रमाणे भोस्तकर यांची संस्थेच्या माणगांव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली असून त्यांना अधिकार बहाल केले आहे
   रेशनिंग दुकान गैरव्यवहार,घरेलू गॅस संदर्भातील तक्रारी, खाण्याच्या वस्तू, मोबाईल खरेदी विक्री लापरवाही, रेल्वेसेवा, एस टी महामंडळ ट्रॅव्हल कंपनीची लुबाडणूक, घर, जमिन खरेदी विक्री अफरातफर, विद्युत मंडळ, व्यापारी वर्गापासून होणारी लूट औषधे विक्री फसवणूक, अशा ग्राहक संरक्षण कायद्या नुसार विविध पध्दतीच्या तक्रारीचे निवारण करण्याचे कार्य भोस्तेकर यांच्यावर सोपवण्यात आल्याने माणगांव तालुक्यात ग्रांमस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असलेल्या पाहायला मिळाले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा