पूर्ववैमनातून ६८ वर्षीय वृध्दाची हत्या आरोपीच्या शोधात पोलीस.



संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा तालुक्यातील बनोटी गावातील गोवींद नागू नाक्ती वय ६८ रा.बनोटी यांची पूर्ववैम- नस्य व किरकोळ वादातून शेजारी असणाऱ्या यशोधन भरत गाणेकर वय२०या युवकाने हत्या केल्याची घटना काल दिं.१७ रोजी घडली. सदर घटनेची नोंद फिर्यादी भाऊ नामदेव नाक्ती याने म्हसळा पोलीसांत दिल्याने गु.र.नं १५ /२०२१ भादवी३०२, ३२४,
५०४, ५०६ प्रमाणे करण्यात आली आहे. यशोधन याला त्याच्या वर्तणुकीबाबत मयत गोवींद याने समज दिल्यामुळे त्याच्या मनात आलेल्या क्रोधामुळे यशोधन याने टोकाची भूमिका घेतली असावी अशी चर्चा आगरी पट्ट्यांत आहे. गोवींद याला यशोधन ने लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत तो प्रथम गंभीर जखमी व नंतर उपचाराला नेत असताना मृत झाल्याचे समजते.घटनेचा तपास स.पो.नी. धनंजय पोरे करीत आहेत.घटनेचे गांभीर्य पहाता श्रीवर्धनचे प्रभारी Dysp टी.एस.पाटील यानी घटना स्थळी भेट दिल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा