श्रीवर्धन वासीयांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमच्या कामाची पोच पावती खा. सुनील तटकरे


श्रीवर्धन वासीयांच्या स्वप्नातील विकास खा. सुनील तटकरे साहेबांच्या माध्यमातून करणार - ना. आदिती तटकरे

 श्रीवर्धन(विजय गिरी ) :- कोरोनामुळे श्रीवर्धनमध्ये कार्यक्रम घेता आले नाहीत. मात्र श्रीवर्धनला पर्यटनाचा ब दर्जा दिल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने प्रत्येक पाखाडी पाखडीत विकासकाम करणार श्रीवर्धन वासीयांच्या स्वप्नातील विकास खा. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून करणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केलं. श्रीवर्धनमधील विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी घेतलेल्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, उपनगराध्यक्ष यशवंत चौलकर, नगरसेवक अनंत गुरव, वसंत यादव प्रगती आडवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

            गेले बारा वर्षे या परिसराचा कायलापालट करण्याचा प्रयत्न केला पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कशाप्रकारे विकास करता येईल याला प्राधान्य दिले. श्रीवर्धन वासीयांनी वेळोवेळी विश्वास दाखवला म्हणून टप्याटप्याने विकास साधता आला. आज श्रीवर्धन वासीयांच्या चेहऱ्यावर आसलेला समाधान हीच आमच्या कामाची पोचपावती असल्याचे वक्तव्य खा. सुनील तटकरे यांनी केले. रोह्यातील कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प पाहून शरद पवार साहेबानी कौतुकाची थाप दिली व अजितदादांनी देखील दखल घेत बारामती मधूम संवर्धन प्रकल्प पाहण्यास टीम पाठवली. आणि आपण केलेल्या संवर्धन प्रकल्प पाहून त्यापद्धतीने बारामतीत करण्याचा मानस अजितदादा यांचा आहे. याचे श्रेय पालकमंत्री आदिती तटकरे याना देताना पाहिले बाप से बेटा सवाई अशी म्हण होती परंतु आपल्याकडे आता बाप से बेटी सवाई अशी परिस्थिती आहे अस खा. तटकरे यांनी म्हणत पालकमंत्री आदिती तटकरे याना शाबासकीची थाप दिली. यावेळी बोलताना जीवनात अनेक संकट पहिली सुख  दुःख अनुभवले आहेत मात्र मी कधीच रडलो नाही. मात्र तीन जूनला आलेला चक्रीवादळ मी मुंबईत होतो वाहिन्यांवर पाहत होतो. गेल्या ४५ वर्षांपासून मी श्रीवर्धन पाहतोय पण सहा जूनला पाहिलेला श्रीवर्धन पाहून डोळ्यात अश्रू अनावर झाले. मात्र पुन्हा एकदा श्रीवर्धनच गतवैभव पुनरप्रस्थापित करण्यात शरद पवार साहेब मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , अजितदादा पवार सर्वांचे आभार मानले. समोरच श्रीमंत बालाजी विश्वनाथ पशवे मंदिराचे रखडलेले काम काही असलेल्या अडचणी दूर करून पूर्ण करण्याची मोठी ईच्या असल्याचे तटकरे यांनी व्यक्त केले. यावेळी शहरातील शिवाजी चौक चे छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामांकरण ,कुंभारवाडा विभागातील चौकास संत शिरोमणी गोरोबाकाका चौक नामांकरण करणे ,शहरातील गणेश आळी पासून जीवना रोड पर्यंत पऱ्ह्याच्या कामाचे उदघाटन करून लोकार्पण करणे ,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापासून राजू भगत यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे उद्घाटन ,वरचा जीवना येथील पऱ्ह्याच्या कामाचे उदघाटन करणे ,इंदिरानगर येथील स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाचे उद्घाटन करणे ,मुळगाव गांधी मैदान येथील पऱ्ह्याचे कामाचे उद्घाटन करणे ,पेशवे आळी पासुन दादर पुला पर्यंतच्या पऱ्ह्याच्या कामाचे उद्घाटन व लोकार्पण तसेच फकी मोहल्ला येथील कब्रस्थानाला कंपाउंड वाल बांधणे कामाचे भूमिपूजन आदी कामांचा उदघाटन यावेळी खा. सुनिल तटकरे, पालकमंत्रीी अदिती तटकरे यााच्या हस्ते करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा