म्हसळा महावितरणचे विज ग्राहकानी थकविले रुपये ४ कोटी ८५ लक्ष २४ हजार : आता विजबिल भरा अन्यथा कनेक्शन तोडण्याच्या कारवाईला सामोरे जा.
संजय खांबेटे : म्हसळा
थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावित- रणकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला शासना ने दिलेली स्थगिती सरकारने मागे घेतल्या नंतर आता पुन्हा वीज कर्मचारी वसुलीसाठी कारवाईला सज्ज झालेआसताना म्हसळा महावितरणचे तालुक्यांतील ग्राहकानी थकविलेले रुपये ४ कोटी८५ लक्ष २४ हजार वसुलीसाठी सज्ज झाले असून सोमवार दि १५ मार्चपासून थकबाकीदार ग्राहकाना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असे म्हसळा महावितरणचे उप-कार्यकारी अभियंता प्रदीप पटवारी यानी सांगितले.
तालुक्यातील आंबेत, खामगाव,मेंदडी, म्हसळा शहर (1st)आणि म्हसळा ॥ या विभागातील ५७७६ ग्राहकानी रुपये ४ कोटी ८५ लक्ष २४ हजार थकविले आहेत.यामध्ये घरगुती (Residential), व्यवसायिक (commercial) औद्योगिक (Industrial), सरकारी कार्यालये (Public Services), शेती(Agricultrial), पथदिवे(Streetlight), नळ पाणी पुरवठा(Public Water Works) आणि इतर ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे. तालुक्यात घरगुती वापराचे ४ हजार ८६७ ग्राहकांकडे रु ८० लक्ष ३५ हजार, व्यवसायिक वापराचे ३९८ ग्राहकांकडे रु १४ लक्ष२६ हजार औद्योगिक वापराचे ३५ ग्राहकां कडे रु ५लक्ष ११हजार,सरकारी कार्यालये निवास स्थाने १२६ ग्राहकांकडे ६ लक्षर४७ हजार,शेती वापराचे (Agricultrial) ८४ ग्राहकांकडे १लक्ष १६ हजार, पथदिवे (Streetlight) वापराचे १३३ ग्राहकांकडे ३ लक्ष ५१ हजार
नळ पाणी पुरवठा(Public Water Works) चे ४४ ग्राहकांकडे रुपये १० लक्ष २९ हजार रुपये.आणि इतर वापराचे १९ ग्राहकांकडे १५लक्ष ७३ हजार थकबाकी आहे.
म्हसळा महावितरणकडून दररोज १०० हून अधिक वीज कनेक्शन कापण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती समोर येते आहे. २०१९ व करोना काळात म्हणजे एप्रिल २०२० पासून वीज बिल न भरणाऱ्या तसेच कोरोना काळात (Corornavirus Pandemic) या ग्राहकांना वीज बिलात सूट देण्यात आली होतीआशा थकीत सर्व ग्राहकां वर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.
"महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व सहकार्य करावे. आवश्यकता असल्यास हप्त्यांची देखील तसतूद केली जाईल असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे"
Post a Comment