राज्यस्तरीय योगासन स्पर्धा



टीम म्हसळा लाईव्ह

महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन द्वारे प्रथमच ऑनलाईन राज्यस्तर योगासन स्पर्धेचे २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या प्रकारचे आयोजन प्रथमच होत असल्यामुळे स्पर्धा ३ टप्यात होईल. १५, २० व २८ वर्षाआतील मुले आणि १४, १९ व २७ वर्षा आतील मुली अशा  वयोगटात होणाच्या स्पर्धेंसाठी पहिल्या टप्यात खेळाडूना त्यांचे आसन करतांनाचे व्हिडीओ पाठयायचे आहेत. दुसऱ्या टप्यात निवड झालेल्या स्पर्धकांची उपांत्य फेरी व तिसऱ्या टप्यात उपांत्य आणि अंतीम फेरी होणार आहे.

युवक व क्रीडा मंत्रालय आणि आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त तसेच राष्ट्रीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशन ची संलग्न असलेली महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन या स्पर्धेचे आयोजन करत आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना २१ फेब्रुवारी पर्यंत गुगल फार्म द्वारे आपले प्रवेश नोंदवायचे आहेत. ज्या द्वारे खेळाडू आपली पूर्ण माहिती आणि निर्धारीत ७ पैकी ५ आसनांचे व्हिडीओ असोसिएशनला दिलेल्या लिंक मध्ये पाठवतील. यापैकी निवड झालेल्या ३० खेळाइंचा गटशहा निकाल २४ फेब्रुवारीला बोधीत होईल, २७ फेब्रुवारी ते ०२ मार्च चा दरम्यान खेळाूंची ऑनलाईंन उपांत्यपूर्व स्पर्धा होईल, उपांत्यपूर्व स्पर्धेत मागील ३वर्षात राज्य व राष्ट्रीय योगासन स्पर्पेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना सरळ प्रवेश दिला जाईल. अशा खेळाडूंनी त्यांचे व्हिडीओ पाठवताना आपले प्रमाणपत्र फॉर्म मध्ये पाठवावे.

उपात्यपूर्व स्पर्धेचा निकाल ०३ ते ०५ मार्च पर्यंत घोषीत होईल. ११ ते १४ मार्च ला निवड झालेल्या प्रत्येक गटातील २०-२० खेळाडूंची उपांत्य आणि अंतीम फेरीसाठी निवड होईल व त्यांना संगमनेर जि. अहमदनगर येथे स्पर्धेसाठी बोलावले जाईल. यामधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य योगासन संघाची निवड होईल. कोरोना काळामुळे फक्त याच वर्षी ऑनलाईन स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येईल. पूढच्या वर्षी पासून स्पर्धा नियमीतपणे स्पर्धा स्थळावरच होतील यास्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यातून फक्त ३ खेळाडू सहभागी होऊ शकतील.

स्पर्धेत सहभागी खेळाडूंना स्पर्धेची नियमावली, वयोगटानुसार आसन, उपस्थिती दिनांक इत्यादी सर्व माहिती व्हाँटस अप ग्रुप व ई-मेल द्वारे वेळोवेळी देण्यात येईल, तरी राज्याच्या सर्व जिल्हयातील स्पर्धकांनी या पहिल्या ऑनलाईन योगासन स्पर्धेत मोठया संख्येत सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य संघटनेचे अध्यक्ष श्री बापू पडळकर (पूणे), सचिव- संजय मालपाणी (संगमनेर) व स्पर्धा नियंत्रक  सतिश मोहगावकर (जळगांव) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी महेश कुंभार 9664896687 उत्तम मांदारे 8779628851  , हेमंत पयेर 9860601736 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन संटनेने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा