बहुजन क्रांती मोर्च्या वतीने राष्ट्रीय महापुरुषांची म्हसळा तालुक्यात संयुक्त जयंतीचे आयोजन



म्हसळा (अशोक काते)

बहुजन क्रांती मोर्च्याच्या वतीने म्हसळा शहरातील"घनसार मॅरेज हॉल दिघी नाका" येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० ते ०२ या वेळेत राष्ट्रीय महापुरुष बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, राष्ट्रसंत तुकाराम महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत गाडगे महाराज,राष्ट्रसंत सेवालाल महाराज,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,संत नामदेव महाराज यांची संयुक्त जयंती व आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांचा स्मृती दिन साजरा करण्यात येणार आहे.बहुजनांचे विचारवंत महापुरुषांना,थोर संतांना अभिवादन करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने एकत्र येऊन आपल्या सामाजिक ऐक्याचा परिचय द्यावा.आयोजित कार्यक्रमाला संयुक्त अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमार काळे सर,राष्ट्रीय प्रभारी - बहुजन क्रांती मोर्चा,नवी दिल्ली यांचे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका शेतकऱ्यांना बिल्कुल त्रास देऊ नका 'असे आज्ञापत्र काढणाऱ्या बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशात  शेतकरीविरोधी कायदे आणून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र केले जात आहे यावर  एक चर्चा आणि ओबीसींची जातआधारित जनगणना न करता NPR ,CAA आणि NRIC ला राष्ट्रीय जनगणने सोबत जोडले जाऊ शकते असे केल्यास ओबीसी म्हणजे कुणबी,आगरी,कोळी, माळी व मराठा यांचे भविष्यात शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक नुकसान होऊ शकते,EVM हटाव देश बचाव या विषयावर विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा