लोणेरे सरपंचपदी सेनेचे रविंन्द्र टेंबे तर टेमपाले सरपंच पदी संजिदा दाखवे. देवळी ग्रामपंचायत सरपंच विनेश डवले
किरण शिंदे / लोणेरे
ग्रामपंचायत निवडणूकीत ११ पैकी १० सदस्य निवडून आणत विरोधकांना पुन्हा एकदा धूळ चारत गेली २५ वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेली लोणेरे ग्रामपंचायत सरपंच पदी पुन्हा एकदा भगवा फडकला असून सरपंच पदी शिवसेनेचे विद्यमान विभागप्रमुख रविंन्द्र टेंबे यांची वर्णी लागली असून उपसरपंच पदी प्रमोद करकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यसम्राट आमदार भरतशेट गोगावले यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हाप्रमुख अनिलजी नवगुणे, माजी जिल्हाप्रमुख प्रमोदजी घोसाळकर उपसभापती महेंद्र तेटगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या माणगाव तालुक्यांतील लोणेरे, टेमपाले, देवळी ग्रामपंचायत सरपंच पदी सेनेचेच सरपंच, उपसरपंच विराजमान झाले आहेत. यावेळी सदस्य प्रकाश टेंबे, समाधान करकरे, सुजाता टेंबे ज्योती ढेपे, शिवाजी ढेपे,सौ.डवले, अनुष्का टेंबे, प्रियंका श्रीनिवास टेंबे, यांच्यासह अन्य सदस्य देखील उपस्थित होते.
टेमपाले ग्रामपंचायतीच सरपंच निवडणूकीत शिवसेना पाच तर राष्ट्रवादीच्या चार सदस्य असे संख्याबळ असून सरपंचपदी सेनेच्या संजिदा दाखवे तर उपसरपंच पदी गणेश खेळू शिगवण यांची वर्णी लागली आहे. यावेळी सदस्य रूखसार गजगे, ज्ञानदेव शिगवण, वनिता आंबेकर, शाखाप्रमुख निजाम गजगे, अंकित सैन, हिनायत असलूनकर, अलताफ गोडमे, लिसाकत अनसूलकर, जहीर अनसूलकर, गुलाम सैन, फारूक गजगे, जहूर अनसूलकर, लिसाकत गजगे, शिजारूद्दीन अनसूलकर, माजी सरपंच सखाराम शिगवण, अनिल अंबेकर प्रकाश गोविंद शिगवण यांनी मेहनत घेतली.तर देवळी ग्रामपंचायत निवडणुकीत विनेश डवले सरपंच तर. रजणी राजेंद्र सुतार, उपसरपंच पदी निवड करण्यात आली त्यावेळी सखाराम भोजणे, विलास रामचंद्र साळवी, वैशाली विठोबा भोजने,खतिजा लांबे,कृपा अजय रेणूसे, सचिन भोस्तेकर इत्यादी सदस्य उपस्थित होते.
सरपंच निवडीनंतर गोरेगाव जिल्हा परिषद गणाच्या सदस्या अमृता हरवंडकर, उपसभापती महेन्द्र तेटगुरे, मा.सभापती राजेश पानवकर, अरूण चाळके,मा.पचायत समिती सदस्य भाऊसाहेब तात्या करकरे, संजय पवार, जगदिश भोकरे, संजय घोसाळकर , दिनेश हरवंडकर, मा. सरपंच प्रभाकर ढेपे, शाखाप्रमुख दिलीप टेंबे अनिकेत घोसाळकर यांच्यासह सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment