तळा (किशोर पितळे) :- तळा नगरपंचायतीच्या दररोज लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असून याविषयीचे निवेदन आज मंत्रालय येथे राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु. आदिती तटकरे यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना दिले. याबाबत उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी जलसंपदा विभागास तळा नगरपंचायतीचा प्रश्न तात्काळ सोडविण्याबाबत निर्देश दिले.
या नगरपंचायतीला दैनंदिन सुमारे १३५ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याचीआवश्यकता आहे.त्याबाबतचा प्रस्ताव नगरपंचायती मार्फत मुख्य अभियंता, कोकण विभाग यांना देण्यात आलेला आहे.तळा नगरपंचायती नजीकच्या३ कि.मी. अंतरावर असलेल्या वावे धरणातील पाण्याचा वापर करुन तळा शहरातील जनतेला पिण्यासाठी हा पाणीपुरवठा होऊ शकेल. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील वावे धरणातील १३५ दशलक्ष लिटर पिण्याच्या पाण्यासाठीच्याआरक्षणा बाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांना विनंती केली आहे.त्यामुळे तळावासियांचा पाणी प्रश्न लवकरच मिटणार असल्याचे चित्र दिसत आहे. अशी माहीती जिल्हामाहिती कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
Post a Comment