लोणेरे येथील प्रसिध्द व्यवसायिक शांताराम तेटगुरे यांचे दुःखद निधन.




किरण शिंदे / लोणेरे

  गोरेगांव ११ फेब्रु. लोणेरे येथील प्रसिध्द होलसेलर व्यापारी शांताराम लहू तेटगुरे यांचे गुरुवार दिं. ४ फेब्रुवारी २०२१ रोजी दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले.मृत्यु समयी त्यांचे वय ७९ होते.त्यांच्या पश्चात दोन मुलगे,एक मुलगी,सुना,जावंई,नातवंडे,असा परिवार आहे.
   कै.शांताराम तेटगुरे यांचा मुळगांव माणगांव तालुक्यातील दहिवली. ते ४५ वर्षांपूर्वी मुंबईतील एका सुत गिरणीत गिरणी कामगार होते.त्यांनी तेथेच छोटया व्यवसायास सुरुवात केली होती.गिरणी संपा नंतर त्यांनी आपला व्यवसाय लोणेरे येथे सुरू केला.सुरवातीस चणाभट्टी,किराणा माल,भात खरेदीच्या व्यवसायास सुरुवात केली होती. त्यांचा स्वभाव शांत,संयमी,माणूसकी प्रधान होता.व्यवसाया सोबत सामाजिक कार्य सुरू होते.दरम्यान लोणेरे येथे किराणा मालासह अन्य वस्तूंचीं होलसेल दरात विक्री सुरू केली होती.गेल्या काही दिवसांपूर्वी ते अचानक आजारी पडले.त्यांना माणगांव येथील डाॅ.राऊत यांच्या इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचे दुःखद निधन झाले.
    कै.शांताराम तेटगुरे यांच्या अंत्ययात्रेला मुंबई,माणगांव,महाड ,म्हसळा,मंडणगड,तालुक्यासह लोणेरे,गोरेगांव विभागातील सामाजिक,शैक्षणिक,कला क्रिडा,व राजकिय क्षेत्रातील मान्यवर मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती.त्यांची दशक्रिया विधी १३ फेब्रुवारी रोजी तर उत्तर कार्य १६ फेब्रुवारी रोजी लोणेरे येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव विनय ( पप्पूशेठ) तेटगुरे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा