रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाची सभा संपन्न




किरण शिंदे / लोणारे
रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची मासिक सभा ना.म.जोशी विद्याभवन गोरेगाव येथे बुधवार दि.२४/०२/२०२१ रोजी माळी बी.एस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सरस्वती पुजन व दिप प्रज्वलन मेथा एस आर ,माळी सर,पाटील सर,म्हात्रे सर,उतेकर सर,गोरीवले सर,कुंभारे सर यांच्या हस्ते झाले. सर्वांचे गुलाब पुष्प देऊन राजेंद्र पवार यांनी स्वागत केले.
मुख्याध्यापक संघाचे मुखपत्र "ज्ञानदर्पण" या अंकाचे प्रकाशन संस्थेचे सहसचिव शांतीलाल मेथा यांचे शुभाहास्ते झाले. अंकामध्ये प्रथमच शैक्षणिक जाहिराती मिळवून अंकाच्या छापाईचा खर्च उभा करुन एक नविन प्रथा सुरु करुन अंकामध्ये शासन निर्णय, उपयोगी लेख, तंत्रस्नेही जागतिक पुरस्कार प्रप्त शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची मुलाखत, पदाधिकारी, महामंडळ पदाधिकारी यांचे फोन नंबर दिलेत. रायगडची दोन भुषणे मलप्रुष्ठावर प्रसिद्ध केली असल्याने एकंदरीत अंकाचे महत्व वाढले आहे. मुखपत्र संपादक राजेंद्र पवार सर यांनी अंक तयार करताना अनेकांचे मिळालेले सहकार्य व अडचणी स्पष्ट केल्या. तसेच भविष्यात यापेक्षा दर्जेदार अंक कमी खर्चात छापून मिळेल. त्यासाठी सर्वांनी जाहिराती व लेख वेळेत पाठवण्याची विनंती केली. या प्रसंगी मेथा सरांनी सकारात्मक विचाराने काम केल्यास यश मिळतेच हे एका हत्तीच्या कथेन स्पष्ट केले.
सभे मध्ये संघाने व शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई येथे आमदार बाळाराम पाटील, आमदार कपिल पाटील, सर्व शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधिक्षक यांचे समवेत सभा घेऊन रायगडचे १४ प्रश्न प्रभावी पणे मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला. रायगड मधिल मुख्याध्यापकांनी आपल्या समस्या, प्रश्न तालुका संघा मार्फत जिल्हा संघाकडे पाठवावेत. ते निश्चित सोडवले जातील.
जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना कोरोना काळात शिक्षण विभागाने निर्माण केलेली संभ्रमावस्था, विद्यार्थी, पालक यांच्या समस्या, शिक्षकांच्या समस्या, व दैनंदिन शालेय कामकाज करताना होणार प्रचंड शारिरीक,मानसिक ताण तणावास सामोरे जावे लागते. अशी भावना अनेक मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. शिक्षणाधिकारी कार्यालयात, वेतन पथक कार्यालयात व वरिष्ठ लेखापाल कर्यालयात होणारी अडवणूक व मिळणारी अपमानास्पद वागणूक यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. संघटनेच्या पदाधिकारी व सल्लागार यांनी हे सर्व थांबवण्यासाठी आपला संघ ठोसपणे भुमिका घेऊन काम करेल असे आश्वासन दिले.रायगडच्या मुख्याध्यापकांना या पुढे निश्चित सन्मानाची वागणूक शिक्षण विभात मिळेलच. शिवाय सर्व कामे सनदशीर मार्गाने पुर्ण होतील. त्यासाठी संघ शिक्षणाधिकारी, अधिक्षक, शिक्षण उपसंचालक, शिक्षक आमदार यांना योग्यतो पत्रव्यवहार करेल असे सांगण्यात आले. 
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संघाचे क्रुतीसत्र कोलाडला अथवा नागोठणे येथे घेण्याचे निश्चित केले.  अगदिच खेळी मेळीच्या वातावरणात संपुर्ण सभा पार पडली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा