( म्हसळा प्रतिनिधी )
101 क्रू डान्स अॅकॅडमी, नासिक व दि म्हसळा टाईम्स, म्हसळा यांच्या संयुवत विद्यमाने नृत्य प्रेमी विद्यार्थ्यांसाठी कुणबी समाज हॉल - म्हसळा येथे पंधरा दिवसाचा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे.
गुरूवार दिनांक 25 फेबुवारी 2021 ला दोन दिवसाचे मोफत प्रशिक्षण शिबीर रहाणार आहे नंतर पंधरा दिवसांच्या नृत्य प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर शभूषण आहिरे व त्यांचे सहकारी श्री प्रतिक बैरागी यांचे मार्गदर्शन मिळणार आहे, तरी नृत्य कला शिकण्यास इच्छुक असणाऱ्या नृत्य प्रेमी विद्यार्थ्यानी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. या प्रशिक्षणाची फी रु . 1000 -00 इतकी असून संबंधितानी श्री रमेश पोटले संस्थापक दि म्हसळा टाईम्स फोन 9372580850 यांचे जवळ संर्पक साधावा. प्रशिक्षण वर्गाला कोव्हीड १९ च्या नियमांचे आणि सोशल डिस्टंसिंग चे नियम व मास्कचा वापर यावर आयोजक विशेष लक्ष केंदीत करून नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येणार आसत्मा बाबत आयोजकांकडून सांगण्यात आले.
Post a Comment