म्हसळा (बाबू शिर्के)
लोकशाही असलेल्या आपल्या देशात प्रत्येक 18 वर्षे वय असलेल्या नागरिकास मतदानाचा अधिकार आहे. त्याची जाणीव करून देण्यासाठी व देशातील नागरिकां मध्ये मतदानाची ईच्छा व जागृती करण्यासाठी शासनातर्फे ठीक-ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येतात.त्याच अनुषंगाने २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त म्हसळा येथील तहसील कार्यालयात मतदारांसाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम करण्यात आला.तसेच चित्रकला स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. यावेळी नायब तहसिलदार के टी भिंगारे, अनिकेत सोनवणे, अमर ठमके,तहसिल आणी वनविभाग कर्मचारी उपस्थित होते. मतदार असल्याचा अभिमान मतदारास असावा आणि त्यातून बळकट लोकशाहीतील मोठा सहभाग नोंदवता यावा हा या कार्यक्रमाचा उद्देश असून अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून मतदानाचे कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करावी असे आव्हान तहसीलदार शरद गोसावी यांनी कार्यक्रम प्रसंगी केले
Post a Comment