शिवसेना माजी जिल्हा प्रमुख रविभाऊ मुंढे यांनी अखेर हातात घेतले कमळ ; चर्चेला पुर्ण विराम



तळा (किशोर पितळे)तळा नगरपंचायतीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीला वेग येऊ लागला आहे.चार दिवसापूर्वीच अँड निलेश रातवडकर,माजी तळा ग्रामपंचायत सरपंचाअँड. दिव्या रातवडकर समर्थकांसह काँग्रेसला राम राम ठोकून कमळफुल हाती घेतले या पाठोपाठशिवसेना माजी दक्षिणरायगड जिल्हा प्रमुख रविभाऊ मुंढे, मा.नगराध्यक्षा रेश्मा मुंढे यांनी आपल्या कुटुंंबियासह सुभाष मुंढे,रितेश मुंढे,रवींद्र शिगवण,ज्ञानेश्वरघरटकर, 

माजी तालुका प्रमुख विजय तांबे, विलास ठसाळ सह माजीमुख्यमंत्रीतथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजीफडणवीस विरोधी पक्षनेते मा.प्रविणजीदरेकर,माजी पालकमंत्री आम.रविंद्जीचव्हाण,आमदार गिरीश महाजन आम.आशिष शेलार आम.मंगलप्रभात लोढा जिल्हाध्यक्ष महेश मोहीते तालुका अध्यक्ष कैलासजी पायगुडे, माणगांव तालुका अध्यक्षसंजय(अण्णा)ढवळे

तळा शहत्र प्रमुख सुधीर तळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतले. गेल्या लोकसभा निवडणुकी नंतर शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे तसेच स्थानिकांच्या अंतर्गत वादाने दोन महीने वातावरण गढूळ झाले होते.त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षाला लवकरच राम राम करणारअसल्याचे स्पष्ट केले होते.त्यानंतर विठ्ठला कोणता झेंडा हाती घेऊ याबाबत विचारमंथन करून शेवटी भाजपचे कमळफुल हातात घेतले त्यामुळे अखेरीस या विषयावर पडदा पडला.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविभाऊ मुंढेयाना भाजप ची ताकद देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.रायगडात निश्चित परिवर्तन घडवून आणले जाईल असे रवीभाऊ यांनी सांगितले.

त्यामुळे तळा नगरपंचायतीच्या निवडणूकिची समीकरणे बदलली जाणार आहेत.राष्ट्रवादी शिवसेना यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे.नगराध्यक्षा रेश्मा मुंढे यांनी नगरपंचायतीत केलेला विकास निश्चितच उपयोगी ठरेल.मागील विधानसभा निवडणुकीत लोकसभा खासदार सुनिल तटकरे यांचे पुतणे आमदार अवधूत तटकरे यांच्याशी श्रीवर्धन मतदार संघात कडवी झुंज देऊन फक्त ७७मतानी पराभव पत्करावा लागला होता.त्यामुळे यावेळी नगरपंचायत महाआघाडीला जड जाईल असे चित्र स्पष्ट होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा