श्री चंडिका ग्रामदेवीचा(पुनःदर्शन) महोत्सव उत्साहात साजरा.



तळा (किशोर पितळे)तळा येथील नवसाला पावणारी आणि तळेवासियांची श्रध्दास्थान असलेली श्रीचंडिका ग्रामदेवी उत्सव सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला तळा तालुक्यातील बारा वाड्यांचे हे ग्रामदेवता मंदीर शहरांतील अठरा वतनदार पगड जाती या मंदीर सोहळ्यात समाविष्ट होत असतात देवीचा अभिषेक पुजा अर्चा होम हवन षोडशोपचार पुजा आणि सर्व गावातुन वाजत गाजत येणारे पालखी सोहळा हळदी कुंकू समारंभहेजणु गावातील आगळीवेगळीपर्वणीच. ढोल ताशांच्या गजरात बारा वाडयांतील पालखी आपल्या मुख्य चंडिका मातेच्या मंदिरात पोहचतात फुलांनी सजवलेल्या पालख्या पारंपारिक वेश परिधान करुन भक्तगण हातात भगवे झेंडे आणि खांद्यावर पालखी घेत ढोल ताशांच्या गजरात मंदिराकडे रवाना होतात मंदिरात नवचंडी याग,षोडपोचार पुजा पौराहित्य संजय केळकर (गुरुजी सहकारी) यामुळे संपुर्ण परिसर भक्तीमय होऊन गेला होता.                     मंदिरासमोर भक्तांसाठी भव्य प्रांगणात उभारलेले मंडप भक्तांना आकर्षीत करून घेत होते.आकर्षक रंग

रंगोटी,संरक्षक भिंतीना शोभनीय संदेश फलक खास आकर्षण ठरले.प्रशस्त पुरुष,लेडीज प्रसाधनगृह, सभामंडप विस्तीर्ण परिसर अतिशय शोभनीय असून

भक्तांच्या स्वागतासाठी स्वयंसेवक दर्शनासाठी लागलेल्या भाविकांच्या रांगा देवीच्या मिळालेल्या दर्शनामुळे आनंद, प्रसन्नता यावेळी दिसून येत होती देवीच्या दर्शनानंतर भाविकांना महाप्रसादाची सोय केली जाते परंतु कोरोनाच्या पाश्वभुमिवर नाईलाजाने  यावेळीकार्यक्रमात बदल करण्यातआला होता.असंख्य भाविक आवडीने आनंदाने चंडिका मातेचे दर्शन घेण्यासाठी येत असतात यामध्ये तळा शहरातील शाळा, महाविद्यालय आयटीआय काॅलेज येथील विद्यार्थी, शिक्षक वर्ग, व्यापारी, डाॅक्टर्स, पत्रकार प्रतीष्ठीत मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असतात. भाविकांची श्रध्दा आणि भक्ती यामुळे सारा परिसर भक्तीमय होऊन गेला होता पुर्वापार या मंदिरात सारख्या वतनदारांना मिळत असलेला पुजेचा अधिकार लाभ वतन जतन करुन ठेवणारी ही श्री चंडिका भवानी माता यांचे मंदिर ट्रस्ट उत्सव सोहळा आगळा वेगळा साजरा होत असतो.
महेंद्र बाळकृष्ण कजबजे-चंडिका देवी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष.  नवसाला पावणारी श्री.चंडिका अशी ख्याती असून दैवज्ञ(सोनार) समाजपारंपारिक पद्धतीने करीत असत परंतु कालपरत्वे हा पुनःदर्शन सोहळा गावकऱ्यांनी करण्याचे ठरले.२०१२साली मुर्तीला वज्र्यलेप करून पौष चतुर्दशी ते पौर्णिमा या दोन दिवशी साजरा करण्याचे ठरले यंदा हे नववे वर्ष आहे.अतीशय शिस्तबद्ध,धार्मिकपध्दतीने,पावित्र्य,सामाजिकसलोखा बंधुत्व सर्वधर्म समभाव जपून बारा वाड्यातील भक्त
श्री.चंडिकादेवीचा ग्रामोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडत असतात या उत्सवाची तालुक्यातील बारा वाड्यातील सर्व धर्मातील नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात.मुंबई उपनगर, ठाणे पुणे येथून भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येथे येत असतात दोन दिवस हा उत्सव असतो याठिकाणी भाविकांसाठी भक्त निवासाची सुविधा जिल्ह्याच्या पर्यटन आणि पालकमंत्री ना.अदितीताई तटकरे यांच्याकडे ट्रस्टच्या वतीने करणार असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधींकडे बोलताना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा