फोटो- म्हसळा शहरात विकासकामांचे भूमिपूजन करताना ना.अदिती तटकरे यांच्या सहित राष्ट्रवादीचे पदाधिकारी व नगरसेवक दिसत आहेत.
निवडणूक आघाडी बाबत वरिष्ठ निर्णय घेतील - पालकमंत्री अदिती तटकरे
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा नगरपंचायत हद्दीतील शहरात विविध प्रभागांत पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी दहा पेक्षा अधिक नगरसेवक गैरहजर असल्याचा विषय चर्चेचा ठरला. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पालकमंत्री आदिती तटकरे म्हसळा तालुका दौऱ्यावर आल्या असता त्यांच्या हस्ते स्टेट बँक जवळील रस्ता तयार करणे, कन्याशाळा परिसर एकता नगर येथे जाणारा रस्ता तयार करणे, करीम खान साने यांच्या घराजवळील गटार बांधणे व दुर्गवाडी स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
या वेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, राष्ट्रवादीचे नेते अलीशेठ कौचाली, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नाझीम हसवारे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, पं.स.सभापती उज्वला सावंत, नगराध्यक्षा जयश्री कापरे, उप नगराध्यक्ष शोएब हळदे, गट नेते संजय कर्णिक,नगरपंचायत प्रशासक तथा प्रांताधिकारी अमित शेडगे, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, नायब तहसीलदार के.टी.भिंगारे, माजी सभापती छाया म्हात्रे,नगरसेवक करण गायकवाड,संतोष (नाना) सावंत,सतिश शिगवण, मांडवकर,चंद्रकांत कापरे, सरोज म्हशीलकर, शाहिद उकये,अंकुश खडस,अनिल बसवत,जमिर नजिर,अझीझ बशारत,स्वप्निल चांदोरकर यांच्या सहित राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या भूमिपूजन कार्यक्रमावेळी अनेक नगरसेवक गैरहजर असल्याने नगरसेवकांच्या गैरहजेरीचा विषय चर्चेचा ठरला. नगरपंचायत मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग होणार कि नाही या बाबत विचारलेल्या प्रश्नावर पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांनी आघाडी बाबत वरिष्ठ निर्णय घेतील असे सूचक वक्तव्य केले.
Post a Comment