श्री स्वयंभु गुरुदत्त तीर्थक्षेत्र क्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे...


महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री मा. ना. आदितिताई तटकरे यांची स्वयंभु गुरुदत्त मंडळ, मुंबई यांच्याकडून सदिच्छा भेट.

टीम म्हसळा लाईव्ह
       आपल्या स्वयंभु गुरुदत्त मंडळ,मुंबई यांच्याकडून श्री स्वयंभु गुरुदत्त तीर्थक्षेत्र क्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे यासाठी स्वयंभु गुरुदत्त मंडळाच्या पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट घेतली,या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री. रुपेश पाटील, सचिव श्री वैभव चाळके,स्वयंभु गुरुदत्त ट्रस्टचे सरचिटणीस श्री.जनार्दन चाळके,आपटेश्वर मंडळ नवानगर मुंबईचे अध्यक्ष मधुकर नाक्ति,मंडळाचे सल्लागार श्री कुमार धुमाळ,खजिनदार श्री. जनार्दन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
१९७२ साली या ठिकाणी प्रत्यक्ष श्री गुरुदेव दत्त महाराज प्रकट झाले , तेव्हापासून हजारो भक्त दर्शनासाठी दररोज ये जा करतात . परंतु या ठिकाणी पर्यटकांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांपुढे अनेक अडचणी निर्माण होत असल्याने हवा तसा विकास होत नाही . पर्यटकांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे . 
     श्री स्वयंभु गुरुदत्त तीर्थक्षेत्र महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राच्या नकाशावार  आणण्याचे मा. ना. आदितिताई तटकरे यांचे आश्वासन दिले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्री. रुपेश पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा