मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख मा.सदानंद थरवळ यांच्या मातोश्रींच्या अस्थिंचे गुरुवार दि. ३ डिसेंबर रोजी दक्षिण काशी श्रीक्षेत्र हरीहरेश्वर येथील पांडव तिर्थावर विधीवत पुजन करुन विसर्जन करण्यात आले.
मा.सदानंद थरवळ यांच्या मातोश्री कै.सुमती थरवळ यांचे सोमवार दि.२३ नोव्हेंबर रोजी महाड विन्हेरे येथील राहत्या घरी वयाच्या ८८ व्या वर्षी वृध्दपकाळाने निधन झाले.त्यांच्या अस्थि विसर्जनासाठी सदानंद थरवळ हे महाड येथुन सकाळी हरीहरेश्वर येथील पांडव तिर्थावर आले होते.यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना सहसंपर्कप्रमुख तुकाराम सुर्वे,सभापती बाबुराव चोरघे,क्षेत्र संघटक रविंद्र लाड, श्रीवर्धन तालुकाप्रमुख प्रतोष कोलथरकर,म्हसळा तालुकाप्रमुख नंदु शिर्के,ग्राम पंचायत सदस्य सचिन गुरव,हरीहरेश्वर शाखाप्रमुख धिरज बोरकर,माजी उपसरपंच सुयोग लांगी,हरीहरेश्वर संस्थान सचिव सिध्देश पोवार,श्रीवर्धन शहर प्रमुख पिंट्या वेश्विकर,विभागप्रमुख गजानन कदम,म्हसळा तालुका युवा अधिकारी अमित म्हामुणकर व जगदीश कदम इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment