म्हसळा नगरपंचायतीने मागील वर्षाची पाणी आणि घरपट्टी माफ करावी ; बहुजन क्रांती मोर्चाची मागणी




म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

23 मार्च 2020 पासुन कोरोना प्रादुर्भाव महामारीमुळे राज्यात सातत्यपूर्ण होत असलेले लॉक डाऊन आणि 3 जुन रोजी कोकण किनार पट्टीवर झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने बहुतांश लोकांची दैना उडवली आहे त्यातच अनेकांचे धंदा रोजगार,नोकरी व्यवसाय बंद पडला असला कारणाने लोकांना मोठया प्रमाणात आर्थिक चणचण निर्माण झाली आहे असे असताना स्थानिक स्वराज्य संस्थाचे विविध कर,भरमसाठ आलेले विज बिल,बँक लोन यांची  थकीत वसुलीचा तगादा चालु आहे त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत या पार्श्वभूमीवर म्हसळा नगर पंचायतीने गेले वर्षभर कोरोना प्रादुर्भाव आणि निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी सन 2019 /20 मधील आकारण्यात आलेली पाणीपट्टी आणि घरपट्टी पूर्णपणे माफ करावी अशी मागणी म्हसळा तालुका बहुजन क्रांती मोर्चा तर्फे करण्यात आली आहे तशा प्रकारचे लेखी निवेदन बहुजन क्रांती मोर्चा रायगडचे संयोजक सलीम अ.उकये यांचे सहिनीशी म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्षा जयश्री कापरे यांना देण्यात आले. नगरपंचायत कर निर्धारण प्र.सेवा कु.दिपल मुंडे यांचे कडे निवेदन देते वेळी तालुका संयोजक महेश जाधव,तैमुर गोविळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा