हरीहरेश्वर येथील कालभैरव जयंतीवर कोरोनाचे सावट
: भक्तांनी गर्दी न करण्याचे मंदिर न्यासाचे आवाहन
(मकरंद जाधव-बोर्लीपंचतन)
दक्षिण काशी म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र हरीहरेश्वर येथील कालभैरव मंदिरामध्ये दि. ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या कालभैरव जयंती उत्सवाचे यावर्षी १२४ वे वर्ष आहे या जयंती सोहळ्याला देशभरातुन कालभैरवाचे हजारो भाविक येत असतात.परंतु यावर्षी यात्रा उत्सवावर असणारे कोरोनाचे सावट व आरोग्य विभागाने कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या व्यक्त केलेल्या भीतीमुळे यावर्षी हा उत्सव मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मंदीर समितीने घेतला आहे.त्यामुळे सप्तमी ते नवमी या तीन दिवसांच्या कालावधीत मंदीरामध्ये आयोजित केले जाणारे किर्तन,भजन,सांस्कृतिक सामाजिक उपक्रम व महाप्रसाद यापैकी कोणतेही कार्यक्रम होणार नसल्याने भक्तांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.परंतु श्रध्देबरोबरच भाविकांच्या व पर्यायाने गावाच्या आरोग्याची काळजीसुद्धा तितकीच महत्त्वाची असल्याने या जयंती काळात भाविकांनी मंदिरांमध्ये गर्दी करु नये असे पत्रक देवस्थान समितीतर्फे प्रसिध्द करण्यात आल्याचे श्री कालभैरव जयंती उत्सवाचे कार्यवाह श्री.जगदिश कुलकर्णी व श्रीदेव हरीहरेश्वर कालभैरव मंदीर संस्थानचे सचिव व खजिनदार श्री.सिध्देश पोवार यांनी सांगीतले.भक्तांच्या श्रद्धेचा विचार करुन हरेश्वर येथील साई केबल नेटवर्क व सुयोग एंटरटेमेंट या युट्युब चॅनलच्या माध्यमातून अष्टमीच्या लघुरुद्रापासुन ते आरतीपर्यंतच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण हरेश्वर येथील साई केबल नेटवर्कच्या माध्यमातुन सुयोग लांगी करणार असल्याने जगभरातील भक्तांना कालभैरवाच्या जयंती सोहळ्याचा लाभ घरबसल्या घेता येणार आहे.
Post a Comment