स्वराज्य प्रतिष्ठान रायगड शाखा म्हसळा तर्फे बँक ऑफ इंडियातील गैरसोयींबाबत निवेदन




म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

मंगळवार दि.१७ नोव्हेंबर २०२० रोजी, स्वराज्य प्रतिष्ठान रायगड संघटनेच्यावतीने "बँक ऑफ इंडिया" शाखा म्हसळा तालुका यांना बँकेतील गैर सोयीं बाबत निवेदन संघटनेचे संस्थापक श्री.भास्करभाई कारे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले असून म्हसळा तालुका येथे बँक ऑफ इंडिया शाखा म्हसळा येथे सामान्य नागरिकांना होणाऱ्या अडचणीच्या बाबत निवेदन देण्यात आले. ग्रामीण भागातील खेडोपाड्यातील नागरिकांना म्हसळा शाखे मध्ये हिंदी भाषेला सामोरे जावे लागते सदर भाषा ग्रामीण भागातील वयोवृद्ध नागरिकांना येत नसल्यामुळे या ठिकाणी खात्या वरील व्यवहार कळून येत नाही, तसेच गेली ८ महिने शाखे मध्ये पास बुकवर एन्ट्री मिळत नाही, नवीन पास बुक देणे साठी दीड ते दोन महिने कालावधी लागतो, अश्या अनेक समस्याच्या बाबतीत संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. १ डिसेंबर २०२० पासून सर्व अडचणी दूर होतील असे बँक व्यवस्थापक यांचेकडून आश्वाशीत केले आहे.
सदर निवेदन देताना स्वराज्य प्रतिष्ठान संघटनेचे शिलेदार उपस्थित होते. निवेदन स्वीकारताना बँक व्यवस्थापक श्री.प्रसून प्रशांत उपस्थित होते. त्याचप्रमाणे म्हसळा तालुका संघटक - निकेश भेकरे,म्हसळा सहसंपर्क प्रमुख-दिपेश कदम,शिक्षण विभाग उपप्रमुख-संकेत नाकरेकर,अजय रिकामे,अरुण उंडरे,तेजश्रीताई रिकामे,नरेश कोबनाक ,दिलेस वाघे, अजय महाडिक,नितीन खेरटकर ,जगदीश भेकरे, रोशन अग्रे, निखिल कदम, सहकारी मित्र प्रमोद कुळे, संदेश भेकरे, योगेश मेंदडकर आदी उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा