कोरोना कालावधीत मंदिर उघडण्याची भाजपची घाई आणि हिंदुत्वाचा मुद्दा केवळ राजकीय हेतु व सूडभावना - खासदार सुनिल तटकरे
● कोरोना प्रादुर्भाव कार्यकाळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय संयमाने काम हाताळले - खासदार सुनिल तटकरे यांनी केले कौतुक
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
महाराष्ट्र राज्यात पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्याची घाई असलेल्या भारतीय जनता पक्षाला जगा बरोबर देशात आणि आपल्या राज्यात कोरोना प्रादुर्भाव कार्यान्वित असताना बंद असलेली सर्वच धर्मीय प्रार्थनास्थळ आणि श्रद्धास्थान उघडण्यात यावीत याची घाई झाली होती तसेच सत्तेत असलेले आघाडी सरकारला हिंदु धर्माचा विसर पडला की काय अशी बोचरी टीकाटिप्पणी राज्यातील भाजप मंडळी सातत्याने करीत होती भाजपचे मंदिर उघडण्याची घाई आणि हिंदुत्व हे केवळ राजकीय हेतु आणि सुडभावना असल्याचे मत रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी दि.20 रोजी म्हसळा येथे घनकचरा व्यवस्थापनाचे उद्घाटन आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. माजी सभापती नाझीम हसवारे यांचे निवासस्थानाचे प्रांगणात म्हसळा नगरपंचायतीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात खासदार सुनिल तटकरे पुढे बोलताना गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव वाढु नये म्हणूनच देशाबरोबरच सर्वच प्रार्थनास्थळ बंद होती आणि गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला यावर महाराष्ट्र शासनाने यशस्वीपणे मात केली आहे. अशी शाबासकी देताना महाराष्ट्र शासनाने अर्थात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय संयमाने सामोरे जात योग्य वेळी योग्य निर्णय घेतले आणि सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळ उघडण्यात आली. देशात आणि राज्यात अनलॉक प्रकिया सुरू झाल्यावर काही ठिकाणी झालेल्या उत्सवात गर्दी वाढु लागली आहे त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव पुन्हा एकदा हळूहळू जोर धरू लागला असल्याने विरोधकांनी कशाचे राजकारण करावे याचे भान ठेवावे.
म्हसळा नगरपंचायत हद्दीतील स्वच्छता आणि चांगल्या आरोग्यासाठी घनकचरा व्यवस्थापन गरजेचे असुन शहरा लगत शासकीय जागेत घनकचरा व्यवस्थापन कामाचे शुभारंभ आणि नव्याने दोन घंटा गाडीचे हस्तांतरण खासदार सुनिल तटकरे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांचे समावेत पक्षाचे जेष्ठ नेते अलिशेठ कौचाली, तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिल्हा परिषदेचे सभापती बबन मनवे,सभापती उज्वला सावंत,नगराध्यक्षा जयश्री कापरे,नाझीम चोगले,तहसीलदार शरद गोसावी,गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे,पोलिस निरीक्षक धनंजय, माजी सभापती नाझीम हसवारे,शहर अध्यक्ष रियाजभाई, नगर सेवक,पंचायत समितीचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
खासदार तटकरे यांनी आपणांस कोरोना प्रादुर्भाव झाल्या नंतर म्हसळा येथे पहिलाच जाहीर कार्यक्रमास उपस्थीत राहत आहे. येथील जनता सर्वधर्म समभाव जोपासना करित गुण्यागोविंदाने वावरताना सर्वांना प्रेम देणारी आहे. मी आजारी असताना सर्वच क्षेत्रातील मित्र परिवाराने माझे आरोग्य चांगले होण्यासाठी ज्या शुभेच्छा दिल्या आणि प्रार्थना केली त्या बाबत सर्वांचे जाहीर आभार मानले. माणसात मिसळून राहिलेला माणुस कोविड काळात विलगिकरणात राहिल्यावर त्याची अवस्था काय होते याचा अनुभव खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीरपणे सांगितले. या नंतरच्या काळात मतदारसंघातील तालुका आणि शहरांत जास्तीत जास्त विकास कामे करून जनतेच्या अपेक्षा पुर्ण करू असे सांगितले. पालकमंत्री आदितीताईच्या प्रयत्नाने मतदार संघात पर्यटन व्यवसाय उद्योग वाढीचा दृष्टीकोन ठेवून नामदार नवाब मलिक,नामदार आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने तरुणांना व्ययसायिक प्रशिक्षणासाठी साडेपाच कोटींचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ नेते अलीशेठ कौचाली यांनी मनोगत व्यक्त करताना तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील विविध समस्या खासदार सुनिल तटकरे यांच्यासमोर मांडल्या.
नगरपंचायतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास ग्रामीण भागातील जनतेचा उत्तम प्रतिसाद :-
म्हसळा नगरपंचायतीचे मार्फत घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाचे उदघाटन खासदार सुनिल तटकरे यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन नगरपंचायतच्या वतीने करण्यात आलेले असताना शहरातील नागरिक मात्र या कार्यक्रमास जास्त प्रमाणात उपस्थित नव्हते मात्र ग्रामीण भागातील नागरिक शहरातील कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील बहुसंख्य उपस्थिती वरून कार्यक
Post a Comment