मोदींनी शेतकरी, कामगारांना देशोधडीला लावले


टीम म्हसळा लाईव्ह 
कृषी उत्पन्न बाजारसमित्या बंद करण्याचा केंद्राचा डाव असून शेतकर्‍यांच्या जमिनी धनदांडग्याच्या घशात घालण्याचा प्रयत्न केंद्राने चालवला आहे. कामगार हिताचे कायदे रद्द केले. कामगारांचा संप करण्याचा हक्क हिरावून घेतला आहे. कोणत्याही कामगाराला कधीही काढून टाकण्याची तरतूद कामगार कायद्यात केली आहे. शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लाण्याचे कारस्थान केंद्र सरकारने रचले असून आपण ते कधीही यशस्वी होऊ देता कामा नये. यासाठी शेकापक्षाने आयोजित केलेल्या 26 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मोठया संख्येने कार्यकर्त्यांसह जनतेने सहभागी होण्याचे आवाहन शब्दात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी खंडाळे येथे केले.

जनविरोधी कृषी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या एल्गार मोर्चाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या चेंढरे जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, महिला आघाडी प्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्या प्रियदर्शनी पाटील, अ‍ॅड मनोज धुमाळ, अ‍ॅड परेश देशमुख, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, उपसभापती मीनल ठाकूर, खंडाळे सरपंच रंजिता नाईक, उपसरपंच विनोद पाटील, चेंढरे सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच यतीन घरत, बेलकडे सरपंच संजय पाटील, वेश्‍वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, उपसरपंच नंदकुमार कदम, माजी उपसरंच संतोष कनगुटकर, माजी सरपंच नरसिकेत कावजी,  सुचेता कावजी, अजित माळी, ग्रामपंचायत सदस्य अशोक थळे, नरेश गोंधळी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बबन पाटील, सुरेश घरत, सुरेश पाटील, विक्रांत वार्डे आदींसह चेंढरे, वरसोली, कुरुळ, वेश्‍वी-गोंधळपाडा, बेलकडे, वाडगाव येथील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. जयंत पाटील यांनी केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांवर जोरदार टीका केली. हा मोर्चा केंद्र सरकारच्या अन्यायी दोन विधेयक आणि जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांच्या अमंजबजावणी करण्यासाठी आयोजित करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.सुरुवातीला माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांनी प्रस्ताविक केले.

 शेतकर्‍यांच्या कायद्यासाठी ना ना पाटील यांच्या तीन पिढ्यांनी लढा दिला. शेतकर्‍यांची बाजू मांडण्यासाठी स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर अलिबागला येत होते. हा इतिहास नवीन पिढीला सांगण्याची गरज आहे. अन्यायाविरोधात स्थानिकांनी संघटीत रहायला हवे. आम्ही राजकीय अभ्यासवर्गात तयार झालेलो आहोत त्यामुळे आम्ही विचारांशी ठाम आहोत. कामगार आणि शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे कारस्थान या कायद्याने केंद्र सरकाने रचले आहे. हे कारस्थान आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही.
आम.जयंत पाटील,शेकाप सरचिटणीस

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा