श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी ने केलेल्या चिखलात भाजपाचे कमळ फुलवणार -: श्री अमीत घाग युवा मोर्चा अध्यक्ष रायगड.
श्रीवर्धन मध्ये भाजपाची सत्ता आणणार :- तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांची सिंह गर्जना..
श्रीवर्धन मध्ये येवु ठेपलेल्या नगरपालिका व ग्रांमपंचायतींच्या निवडणुकी बद्दल काल भारतीय जनता पार्टी ने श्रीवर्धन सार्वजनिक वाचनालय येथे सभा आयोजित केली होती.या मध्ये भाजपा युवा मोर्चा श्रीवर्धन तालुक्याच्या नविन पदाधिकार्यांची निवड देखील करण्यात आली.
यावेळी युवा पदाधिकार्यांची नेमणुक झाल्यानंतर युवा मोर्चा चे रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी युवा पदाधिकार्यांना संबोधित केले.यावेळी त्यांनी अनेक विषयांवर प्रतिपादन केले. सर्व युवा पदाधिकार्यांना संबोधित करताना ते म्हणाले की राष्ट्रवादी या पक्षांनी म्हणजे तटकरे कुटुंबियांनी श्रीवर्धन मध्ये चिखल करुन ठेवला आहे. आणि त्यांनी केलेल्या चिखलात भाजपा चे कमळ फुलवायचे आहे. तटकरे कुटुबांनी श्रीवर्धन चा आवाज असलेले सर्व युवा यांना लक्षपुर्वक डावलले आहे. व खासदार,आमदार किंवा विधान परिषदचा आमदार असो सर्व पद पक्षाच्या नावाने स्वत: कडे ठेवले आहेत.यामुळे श्रीवर्धन मधुन कोणीच युवा नेत्रुत्व तयार होत नाही. असे ते म्हणाले व भाजपा यांची घराणेशाही संपवुन पुन्हा रयतेचं राज्य आणेल असे ते म्हणाले.
त्याच बरोबर भाजपा चे तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी शिवसेना तयार असेल तर श्रीवर्धन मधुन राष्ट्रवादीला संपवुन टाकु असे बोलुन शिवसेनेला मैत्रीचा हात पुढे केला आहे.त्याचबरोबर आपण जणतेतुन नविन चेहरे या वेळी निवडनुकिच्या रिंगणात आणणार असल्याचे देखील सांगितले.निसर्ग चक्रीवादळा मध्ये तटकरेंनी स्वत: च्या पक्षातील नेते मंडलींना कशा प्रकारे मदत मिळवुन देवुन त्या नेते मंडलींचे खिशे भरले आहेत व खालच्या दर्जाचं राजकारण केले आहे हे हि आपल्याला माहित आहे व याची क्षिक्षा श्रीवर्धन मधली जणताचं त्यांना देईल.असे ते म्हणाले.तसेच भाजपा ने विविध योजना तालुक्यात राबविल्या आहेत त्या मध्ये दिघी विभागात 1500 लोकांनी याचा लाभ घेतला आहे.त्याचबरोबर श्रीवर्धन तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा प्रगतशिल असणार आहे. असे ते म्हणाले.
या सभे साठी भाजपा चे युवा मोर्चा चे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री अमित घाग, उपाध्यक्ष अँड.जयदिप तांबुटकर,तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे, रायगड जिल्हा सरचिटणिस मिलिंद पाटील व युवा पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment