टीम म्हसळा लाईव्ह
महाराष्ट्र सह जगभरात थैमान घालणार्या कोरोना या आजारामुळे मार्च महिन्यापासून सर्वत्र मैदानी खेळ बंद आहेत. तरी आता या आजाराचा प्रादुर्भाव रोहे तालुक्यात कमी दिसून येत असून, मैदानी क्रिकेट खेळण्याची व सामने आयोजित करण्याची परवानगी मिळावी अशा प्रकारचे निवेदन रोहे तहसीलदार कविता जाधव यांना तालुक्यातील सर्व क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या आजाराचा प्रादुर्भाव कमी दिसून येत असून आम्हाला रोहे तालुक्यात कोरोना काळातील सर्व नियम, अटी पाळून, मैदानी खेळ व सामने आयोजित करण्याची परवानगी मिळावी ,अशा प्रकारचे निवेदन रोहे तहसीलदार कविता जाधव यांना रोहे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संकेत देशमुख, धावीर क्रिकेट असो, अध्यक्ष रवींद्र चाळके, कोलाड क्रिकेट असो, अध्यक्ष बाळा महाबळे, नागोठणे क्रिकेट असो. अध्यक्ष राजेश पिंगळे, स्वयंभू क्रिकेट असो. टूटरोली अध्यक्ष सचिन साळवी, चणेरा क्रिकेट असो. अध्यक्ष दिनेश पवार, गोवे खांब क्रिकेट असो. अध्यक्ष प्रवीण धामनसे यांनी दिले आहे.
Post a Comment