कुडगाव आदीवासी वाडीवर बोर्लीपंचतन येथील प्रथमेश महीला बचत गटाकडुन दिवाळी फराळाचे वाटप



मकरंद जाधव-बोर्लीपंचतन 
कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने केलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांचे नोकरी व्यवसाय गेले त्यातच सर्वसामांन्याबरोबरच दुर्गम भागातील गरीब आदिवासींना कामधंदा नसल्याने आपली दैनंदीन उपजिविका करणे या काळात खुपच कठीण गेले.केवळ हातावर पोट असणाऱ्या या गरीब आदिवासींची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दिपावली सणाच्या प्रकाशपर्वापासुन ते दुर आहेत.दिपावली प्रत्येक घरात  साजरी केली जाते,असे नाही अशा गरीब आदिवासींच्या घरात दिवाळी साजरी करण्यास आपलाही हातभार लागुन या गरीब वंचितांनाही या सणाचा गोडवा चाखता यावा या उद्देशाने बोर्लीपंचतन येथील प्रथमेश महीला बचत गटाच्या माध्यमातुन सामाजिक जाणिवेचे भान राखुन श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथील आदीवासी वाडीवरील सुमारे चाळीस कुटुंबांना सोमवार दि.१६ नोव्हेंबर रोजी दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.यावेळी तेथील लहान मुले आणि आदिवासी माता बंधू आणि भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.दिवाळी सणाच्या निमित्ताने दिलेली ही भेट म्हणजे आपण आमच्यासाठी दाखवलेली फार मोठी आदर भावना असून,या सणाच्या दिवशी आमच्या आदीवासी वाडीला फराळ भेट देऊन  आपलसं केल्याबद्दल आभार व्यक्त केले.त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदी भाव पाहून हा उपक्रम राबविणाऱ्या प्रथमेश बचत गटाच्या महीलासुध्दा सुखावून गेल्या.
  याप्रसंगी प्रथमेश महीला स्वयं सहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा मानसी जाधव,उपाध्यक्षा सुजाता पाटील सदस्य संजिवनी आंजर्लेकर, राखी नांदविडकर,प्रविणा परकर, मनिषा शिरवटकर,माधुरी धुमाळ यांनी फराळाचे वाटप करुन आदीवासी बांधवांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा