कोरोना पार्श्वभूमीवर फटाके मुक्त दिवाळी निरुत्साही वातावरणात साजरी.


तळा (किशोर पितळे)मार्च महिन्यापासून नोव्हेंबर पर्यंत कोरोना, लाँकडाऊन,निसर्ग चक्रीवादळ,लहरी पावसाळा,शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान,सतत बदलते वातावरण,याकाळात अनेक जणांंचे महामारीत बळी गेले,भयभीत वातावरण याचा मानवी जीवनावर,व कोलमंडलेले आर्थिक स्रोत याचा  मोठा फटका सर्व सामान्य माणसाला चांगलाच बसला आहे.दिवाळी सारखा सण असुन  बाजारपेठा ओस पडल्या.ऋण काढून सण साजरे करणे आपलीसंस्कार संस्कृती आहे.एक सण वायंडा तर बाकीचे सण वायंडे जातात असे अनुभव पुर्वजांपासूनसांगत आले आहेत. त्यामुळे आलेल्या परिस्थितीचा विचार करून निरूत्साह तर आहे.त्यामुळे अबाला पासून यूवापिढीने यंदा फटाके मुक्त दिवाळी साजरी केली.सणानिमित्ताने दिवाळीचा फराळ मर्यादित केला गेला तर बहिण भावाच्या पवित्र बंधनात भाऊबीज देखील या सर्व परिस्थितीचा विचार करून सुरळीतपणे वाहतूक व्यवस्था न झाल्याने एकमेकांना सांभाळून घेतलेले दिसतआहेअजूनही मुंबई,ठाणे,पुणे शहरात जाण्यासाठी रेल्वे,बससेवा, नसल्याने भावा बहीणीकडे जाता येत नसल्याने शुभेच्छा देणे हेच फक्त मोबाईलच्या माध्यमातून दिल्या गेल्या असे वास्तव समोर आले आहेअशा निरूत्साही वातावरणात दिवाळी सण साजरा केला. 
 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा