हरवित आदीवासी वाडीवर दिवाळी फराळाचे वाटप


सह्याद्री विद्यार्थी प्रतिष्ठानने साजरी केली सामाजिक दिवाळी
मकरंद जाधव-बोर्लीपंचतन 
  आसमंतात प्रकाशाच्या सप्तरंगाची उधळण करणारा,रांगोळी,गोडधोड फराळाचा व आनंद द्विगुणित करणारा,तिमीरातुन तेजाकडे नेणारा प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिपावली.या सणाला परीस्थितीनुसार प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीचा फराळ बनवून फटाक्यांची आतषबाजी करुन दिवाळी सण मोठ्या उत्सहात व आनंदात साजरा केला जातो,यावर्षी या सणावर कोरोनाचे सावट असल्याने सर्वसामान्यांबरोबरच गोरगरीब, मोलमजूरी करणाऱ्या गरजू कुटुंबांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करताना खुप मोठी अडचड निर्माण होत आहे. दिवाळी सण जवळ आला कि गोरगरीब आदिवासी वस्तीतील नागरीकांना आपण देखिल दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करावी. तसेच वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवावे असे वाटते.अशा वंचीत गरीब लोकांच्या भावनांचा विचार करुन या आनंदमय उत्सवाच्या प्रसंगी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी अकादमी श्रीवर्धन विभाग आयोजित "एक हात मदतीचा" माणसातील माणुसकीपण जपण्याचा...'या सामाजिक जाणिवेतुन शनिवार दि.१४ नोव्हेंबर रोजी श्रीवर्धन तालुक्यातील मौजे हरवीत येथील आदिवासी वाडीवर गरीब तसेच गरजु लोकांना त्यांच्याच मदतीने फराळ बनवून वाटप करण्यात आले.यावेळी लहान मुलांनी रांगोळी काढुन आणि आदिवासी बच्चे कंपनीसोबत फटाके फोडुन त्यांना नवीन कपड्यांचे वाटप करुन वंचित व उपेक्षितांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलवुन सामाजिक दिवाळी साजरी करुन गरीब आदीवासींच्या घरांमध्ये दिवाळीचा प्रकाश खऱ्या अर्थाने पोहचविण्याचा एक छोटासा प्रयत्न सह्याद्री विद्यार्थी अकादमीने केला.
   या कार्यक्रमाला समस्त गावकरी तसेच सह्याद्री विद्यार्थी अकादमीचे प्रयोग किर,ऐश्वर्य विलणकर,सोहम विलणकर,आदिनाथ विलणकर,यश नागवेकर,सर्वेश विलणकर,अनुप्रिता विलणकर,स्नेहल विलणकर,दिव्या विलणकर हे उपस्थित होते.
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सह्याद्री विद्यार्थी अकादमीला या उपक्रमासाठी ज्यांनी मदतीचा हात देउन सहकार्य केले त्या सर्वांचे सह्याद्री प्रतिष्ठानकडुन आभार मानण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा