दिवेआगर येथे आर.डी.सी.सी. बँकेच्या एटीएम केंद्राचे उद्घाटन


 मकरंद जाधव - बोर्लीपंचतन 
देशातील सर्वोत्तम जिल्हा सहकारी बँक तसेच राज्यस्तरिय देशपातळीवरील सर्वोच्च पुरस्कार संपादन करणारी व शेतकऱ्यांची हक्काची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.अलिबाग बँकेच्या बोर्लीपंचतन शाखेच्या वतीने मंगळवार दि.३ नोव्हेंबर २०२० रोजी प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र दिवेआगर येथील सुवर्ण गणेश पाखाडी येथे बँकेच्या एटीएम केंद्राचा उद्घाटन समारंभ पार पडला सरपंच उदय बापट यांनी श्रीफळ वाढवुन कार्यक्रमाचा शुभारंभ केला तर संचालक श्री.वसंत यादव यांच्या हस्ते फित कापुन एटीएमचे उद्घाटन करण्यात आले.बँकेच्या या एटीएम सेवा केंद्रामुळे शेतकऱ्यांना २४ तास पैसे मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक असुन शेतकऱ्यांच्या सुविधांकरिता बँकेने पुढाकार घेवून एटीएम सेवा सुरु केली आहे.डिजिटलच्या जमान्यात आमचा शेतकरीसुध्दा तंत्रज्ञान शिकला पाहिजे वेळेची बचत करण्यासाठी शेतकऱ्यांनी एटीएम सेवेचा लाभ घ्यावा त्याचबरोबर राज्यभरातुन दिवेआगरला येणाऱ्या पर्यटकांनासुध्दा या सेवेचा नक्कीच उपयोग होणार आहे.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांना आपली बँक वाटते.गोरगरीबांच्या व शेतकऱ्यांच्या हक्काची बँक म्हणून या बँकेची ख्याती आहे.शासनाच्या विविध योजना बँकेमार्फत राबविल्या जातात.
  सदर कार्यक्रमाला लालाभाई जोशी, बोर्लीपंचतन शाखाधिकारी प्रकाश खेऊर,श्रीवर्धन शाखाधिकारी एस एम जगताप,म्हसळा शाखाधिकारी दिलीप सरदार बँक निरीक्षक लिलाधर रीकामे मुख्य कार्यालयाकडुन मिलिंद वाड,सचिन गुरव,त्याचबरोबर महेश पिळणकर,लिलाधर खोत सर, शशीकांत सुर्वे,तृप्ती चोगले जेष्ठ पत्रकार ऊदय कळस पंचक्रोशीतील शेतकरी,बँकेचे ग्राहक व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा