तळा तालुक्यातील ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात तळा तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. ओबीसीचा आंदोलन एल्गार-
तळा (किशोर पितळे) रायगड जिल्ह्यातील तळा तालुका येथील ओबीसी समाजातर्फे आपल्या प्रलंबित मागण्या व मराठा समाजाचे करण्यात येणारे ओबीसीकरण याला विरोध करण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच दिवशी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक ३ नोव्हेंबर२०२० रोजी ठीक सकाळी ११:00 वाजता तळा तालुक्यातील ओबीसी समाजातर्फे covid-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाचे अटी नियमांचे पालन करीत शांतते मध्ये ओबीसी संघर्ष समिती तळा समन्वयक सचिन कदम यांच्या हस्ते तळा तहसीलदार ए.एम. कन्नशेट्टी यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात प्रामुख्याने
१) जातनिहाय जनगणना.झालीच पाहिजे.
२) मराठा जातीचे ओबीसीकरण... करू नये.
३) स्पर्धा परीक्षा. झालीच पाहिजे
४) सरकारी मेगा भरती. झालीच पाहिजे
५) ओबीसींना विद्यार्थ्यांना १००% शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे.
६)महाज्योतीला, हजार कोटी मिळालेच पाहिजेत
७) ओबीसी सर्व महामंडळाना निधी. मिळालाच पाहिजे ८) ओबीसी शिक्षक भरती.
९) ओबीसींना घरकुल योजना लागू करा, १०)ओबीसी शेतकरी, शेतमजूर व कारागिरांना पेन्शन योजना.चालू करा.११) शासकीय ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण पाहिजे.अशा विविध प्रलंबित मागण्याचे निवेदनात म्हटले आहे.त्याप्रसंगी ओबीसी संघर्ष समिती तळा तालुका समन्वयक - सचिन कदम, तालुका संघटक राजू थिटेकर,कुणबी युवा तसेच कुणबी समाज प्रतिनिधी चंद्रकांत भोरावकर ,स्वप्निल वरंडे, आमिष भौङ,नागेश लोखंडे, राम सावंत, मंगेश पारावे, कांतीलाल कसबळे मंगेश शिगवण, सुनील भौङ, रमेश पिंपळे ,रवींद्रपवार तळा तालुका शिंपी समाज अध्यक्ष- महेंद्र कजबजे, चंद्रकांत रोडे, श्रीराम कजबजे, तळा सुतार समाज प्रतिनिधी - किरण सातांबेकर, किरण नागावकर, सोनार समाज प्रतिनिधी- किशोर पितळे तळा नाभिक समाज प्रतिनिधी- समीर शिर्के, तळा कुंभार समाज प्रतिनिधी- राजेंद्र कुडेकर ,उमेश रातवडकर, आगरी समाज प्रतिनिधी- दीपक ठाकूर, पत्रकार संध्या पिंगळे आणि तळा तालुक्यातील ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment