म्हसळा (बाबू शिर्के)
आविष्कार सोशिअल आणी एज्युकेशन फौंडेशन (कोल्हापूर) ही संस्था सामाजिक, कला , क्रीडा आणी शैक्षणिक क्षेत्रात मागील चौदा वर्षे कार्यरत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात या संस्थेचे जाळे पसरले असून रायगड जिल्ह्यातसुद्धा या संस्थेच्या वतीने नवीन कार्यकारिणी नेमण्यात आली. त्या अनुषंगाने म्हसळा तालुका अध्यक्ष पदी देवघर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष सुर्वे यांची निवड करण्यात आली. संतोष सुर्वे हे गेले अनेक वर्षे म्हसळा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत. तालुक्यात या संस्थेच्या माध्यमातुन अनेक लोकउपयोगी कामे करणार असल्याचे संतोष सुर्वे यांनी आमच्या वार्ताहरांशी बोलताना सांगितले.अविष्कार फौंडेशनच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिल महामुनकर, शिवसेना माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के, शेकापचे विनायक गिजे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष समीर बनकर, शहरप्रमुख अनिकेत पानसरे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment