रोहा (निखिल दाते)
रोह्यातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब रोहा सेंट्रलची युथ विंग असलेल्या रोट्रॅक्ट क्लब रोहा सेंट्रलच्या सभासदांनी एकत्र येऊन स्थानिक विक्रेत्यांकडून दिवाळी साहित्याची खरेदी करत 'व्होकल फॉर लोकल' आणि 'सपोर्ट लोकल वेंडर्स' असा स्तुत्य सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न रविवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी केला .
इ कॉमर्स वेबसाइट वरून खरेदी करण्यापेक्षा स्थानिक खरेदी करण्याच्या या कार्यक्रमास क्लबच्या नियोजित चार्टर्ड प्रेसिडेंट वैष्णवी पोटे, चार्टर्ड व्हाईस प्रेसिडेंट देवश्री जंगले, चार्टर्ड सेक्रेटरी नील डिसूजा, आकाश रूमडे, जयेश चौलकर, भावेश वीरा, यश शिंदे, सृष्टी वाणी, सत्येन देशपांडे ,मंथन वाटवे, युवराज सकपाळ, आदी नियोजित पदाधिकारी उपस्थित होते. तसेच रोट्रॅक्ट क्लब ऑफ डी वाय पी आय एम एस यांच्या संकल्पनेतून 'फुड डोनेशन २, सहयोग १.०' ह्याला रोट्रॅक्ट क्लब ऑफ निगडी सोबत सहयोग करत आज आकुर्डीला रोट्रॅक्ट क्लब रोहा सेंट्रल कडून अन्नदान करण्यात आले.
रोट्रॅक्ट क्लब रोहा सेंट्रलने या उपक्रमाद्वारे अत्यंत चांगली सुरुवात केली असून लवकरच रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मधील रोटरीच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोट्रॅक्ट क्लब रोहा सेंट्रलचा संस्थापन सोहळा दिमाखात संपन्न होणार असल्याची माहिती रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे अध्यक्ष महेंद्र दिवेकर यांनी दिली.
Post a Comment