तळा(किशोर पितळे)
तळा तालुका मनसे अध्यक्ष सुप्रभात(भाई)कुंडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यू समयी अवध्या ४० वर्षाचे होते.पश्चात आई वडील, पत्नी, मुलगा व दोन मुली असा परीवार आहे.
कै.भाई याला सहा दिवसापुर्वी अचानक हायपर ब्लडप्रेशरचा त्रास झाल्याने मुंबई येथे अपोलो हाँस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते प्रकृती साथ देत नव्हती व गंभीर होत गेली. दि ६ रोजी पहाटे एक ते दोन च्या उपचाऱ्या दरम्यान प्राणज्योत मावळली. या दुर्दैवी घटनेची बातमी समजताच संपूर्ण तळा शहर शोकाकुल झाले.उमदे, हसरे,गोजिरवाणे खेळकर,मृदू भाषी, क्रिकेटपटू, दानशूर व्यक्तीमत्व हरपले. युवा पिढीला समावून घेणारा युवकांचा आधारस्तंभ होता. तळा तालूक्याचा मनसे अध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या विश्वासाने सोपवली होती.यांच्या अल्पशा आजाराने निधन झाल्याने सर्व स्तरावरून हळहळ व्यक्त केली जात आहे. तळा शहरातील सर्व व्यापारी बंधूंनी बाजारपेठ बंद ठेऊन दुखःव्यक्त केले.
Post a Comment