रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक भारती शाखा म्हसळा यांच्यावतीने कोविड योद्धा सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न
● शिक्षणाच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी एक कौतुक सोहळा
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक भारती शाखा म्हसळा यांच्यावतीने शुक्रवार दि.06 नोव्हेंबर रोजी कोविड-19 च्या प्रादुर्भाव काळात जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाय यासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या तालुक्यातील शिक्षक, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी यांना 'कोविड योध्दा' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारात शाल,कोविड योध्दा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. म्हसळा तालुक्यातील एकूण 25 व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष विनोद कडव, राज्य प्रवक्ते सतीश हुले, रायगड जिल्हाध्यक्ष संजय पोईलकर, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा पाटील, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे म्हसळा तालुका अध्यक्ष सुनिल पवार,अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर मोहिते,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजी गटाचे तालुका अध्यक्ष नरेश सावंत,जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुका अध्यक्ष महेश राव,पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक नितीन गर्जे, माजी जिल्हाध्यक्ष सचिन गिजे,अलिबाग तालुका अध्यक्ष निलेश तुरे,खालापूर तालुका अध्यक्ष सुनील पांगारे,सुधागड तालुका अध्यक्ष पांडुरंग पारधी,माणगाव तालुका अध्यक्ष सचिन गंगावणे,सचिन कांबळे(अलिबाग), सुभाष ओव्हाळ(माणगाव), हरिश्चंद्र साळुंखे(खालापूर), विनायक शिंदे(रोहा) व म्हसळा तालुक्यातील सर्व संघटनांचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुका अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनसंदर्भात विस्तृत माहिती देत म्हसळा तालुक्यात शिक्षणाचे ऑनलाईन कार्य करीत असताना शिक्षक कोविड -19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनतेला शासनाच्या आदेशान्वये सूचित आणि जागरूक करण्याचे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सुनिल पवार यांनी मनोगतात शिक्षक भारतीने राबविलेल्या कोविड योद्धा पुरस्कार सोहळ्याचे अभिनंदन केले. शिक्षक भारतीच्या या उपक्रमाने खऱ्या अर्थाने शिक्षक करीत असलेल्या कोविड-19 च्या कार्याची दखल घेतली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर मोहिते यांनी आपल्या मनोगतात तालुक्यातील शिक्षकांच्या अनेक प्रश्नांविषयी विस्तृत चर्चा केली, त्यांनी पुढे सांगितले की शिक्षक भारती शिक्षकांचे प्रश्न सोडावीत असतानाच समाजात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सुद्धा करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले.शिक्षक भारती संघटना म्हसळा तालुक्यात वाढण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या व स्वतः शिक्षक भारती संघटनेने केलेल्या आवाहनास नेहमीच सहकार्य करण्यासाठी तत्पर असू असे सांगितले. राज्य प्रवक्ते सतीश हुले यांनी संघटनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीबाबत माहिती दिली. शिक्षक भारती संघटनेचे नेते व सन्माननीय शिक्षक आमदार कपिल पाटील साहेब यांनी शिक्षकांच्या हिताच्या बाबतीत घेतलेल्या भूमिका व शिक्षकांवर लादलेल्या अन्यायकारक निर्णयांच्या विरोधात शासनाशी केलेला संघर्ष प्रकर्षाने मांडला. जिल्हाध्यक्ष संजय पोईलकर यांनी जिल्हा संघटना नेहमीच जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले. शिक्षक संघ शिवाजी गटाचे तालुका अध्यक्ष नरेश सावंत यांनी तालुक्यातील शिक्षक संघटना जरी वेगळ्या वेगळ्या असल्या तरी म्हसळा तालुक्यात मात्र सर्व संघटनांच्यात समन्वय असून शिक्षक हितासाठी सर्व संघटना एकत्र येऊन कार्य करतात असे सांगितले, त्यांनी शिक्षक भारतीच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच व्यासपीठावरील अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यामध्ये पेण शिक्षक पतपेढीचे संचालक नितीन गर्जे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुका अध्यक्ष महेश राव,प्रकाश मांडवकर,प्रमोद फकीरे यांनी आपआपले मनोगत व्यक्त करून शिक्षक भारतीच्या उपक्रमाचे कौतुक करून संघटनेने केलेल्या कोविड योध्दा सन्मानाचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित महागावकर यांनी केले तर तालुका उपाध्यक्ष राहूल नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
तालुक्यातील सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सहकार्य केले.
Post a Comment