काेकण रेल्वे मार्गावरील हाय टेंशन काँपर वायर चाेरणारे आराेपी पाेलीसांच्या ताब्यात ; गाेरेगांव पाेलीसांची धडक कारवाई.


काेकण रेल्वे मार्गावरील हाय टेंशन काँपर(तांब्याची) वायर चाेरणारे आराेपी पाेलीसांच्या ताब्यात ; गाेरेगांव पाेलीसांची धडक कारवाई.

किरण शिंदे 

 गोरेगाव दि 2 नोव्हें- माणगांव तालुक्यातील गाेरेगांव पाेलीस ठाणे हद्दीत नागाव गावाजवळ मागील महीन्यात काेकण रेल्वे मार्गावरील तांब्याची वायर चाेरण्याची घटना घडली हाेती. गोरेगाव पाेलीसांची सतर्कता व शाेधमाेहीम व स्थानिक नागरीक व इन्स्पेक्टर रेल्वे सुरक्षा बल चिपळूण व त्यांची डिटेक्टिव्ह टीम  यांच्या  सहकार्यामुळे फिर्यादी टुणटुणकुमार सिंग यांची फिर्यादीनुसार शोध सुरू असताना माणगांव निजामपुर विभागातील काेस्ते आदीवासीवाडी,  खर्डी आदीवासीवाडी, व कुंभार्ते गांवातील एकुण सहा संशयितांना गाेरेगांव पाेलीसांनी  आज दिनांक 2 नाेव्हेंबर राेजी ताब्यात घेतले व संशयितांनी पुर्ण तपासाअंती आपला गुन्हा कबुल केला या गुन्ह्यामध्ये सुमारे 81000/- किंमतीची तांब्याची तार सुमारे 135 मीटर इतकी वायर चाेरी झाली हाेती. सदर प्रकरणी गाेरेगांव पाेलीस ठाण्यात काँ, गुन्हा रजि नं 44/2020 भा दं वि कलम 379,411,34  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणातील आराेपींना माणगांव पाेलीस ठाणे येथे अटक करण्यात आली आहे व पुढील तपास पाे. नि. टाेम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गाेरेगांव पाेलीस करत आहेत. गाेरेगांव पाेलीसांच्या या कारवाईबद्दल माणगांव तालुक्यातुन सर्वत्र काेैतुक  हाेत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा