तळा(किशोर पितळे)रायगड औद्योगिक पेन्शनर्स वेल्फेअर असो.ची जिल्हा कार्यकारिणीची सभा माणगांव येथे २६आँक्टोबंर रोजी घेण्यात आली हि सभा उपाध्यक्षखाडिलकर साहेबयांच्याअध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष शिवाजी बामणे यांचे निधन झाल्याने माणगांव येथील बी एस अंबुर्ले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी कै.बामणे यांना श्रद्धांंजली वाहण्यात आली.व ३०आँक्टोबंर रोजीनवनिर्वाचीत जिल्हाध्यक्ष अंबुर्ले याचा सत्कार समारंभ माणगांव येथे मोतीराम प्लाझा
येथे हाँल मध्ये माणगांव युनिट चे अध्यक्ष विजय कदम यांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी सवतीरकर साहेब यांनी प्रास्ताविक करून संघटनेचे महत्त्व संघटन यावर मनोगत व्यक्त केले.जिल्हाध्यक्ष अंबुर्ले
यांनी सत्काराला उत्तरदेताना म्हणाले की.या संघटनेत
औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या,बँका,एस् टी महामंडळ,
वीज वितरण कंपनी, विविध सह.सोसायटी सेवा निवृत्त कर्मचारी येत असून पासष्ट लाख पेन्शनर्स धारक आहेत.या ई पी ओ.९५च्या फँमीली पेन्शन चे सर्व नियम लागू असूनही त्याप्रमाणे पेन्शन चा लाभ मिळत नाही. मिळणारी पेन्शन हजार/दोन हजार
हि तुटपुंजी असून ती औषधोपचारासाठी देखील पुरत नाही. त्याही पेक्षा अधिक खर्च करावा लागतआहे. आमच्या हक्काची पेन्शन मिळालीच पाहिजे किमान साडेसात हजार व महागाई व एकहजार रू.मेडिकल भत्ता मिळाला पाहिजे अशी मागणी आहे. त्यासाठी संघटना वाढली पाहिजे.यासाठी संघर्ष करावा लागणार आहे यासाठी सरकारला जागे करायची वेळ आली आहे.असे जिल्हाध्यक्ष अंबुर्ले यांनी सांगून माझ्या वर दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले.यावेळी पत्रकार तथा सदस्य यांनी जिल्हाध्यक्ष यांना पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या..या सभेला युनिट मधील बहूसंख्येने सदस्य उपस्थित होते.
Post a Comment