स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून तळा तालुक्यात शेतकऱ्यांना शेळी संचाचे वाटप.



(तळा किशोर पितळे)

तळा तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून शेळी संचाचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन काळात अनेक मुंबईतील चाकरमानी गावाकडे परतले आहेत.नोकऱ्या गमवाव्या लागल्यामुळे  अनेकांनी शेतीला पसंती दिली आहे. मात्र परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक फटका बसला आहे.अशावेळी एखादा व्यवसाय हाती असेल तर उद्भभवलेल्या परिस्थितीवर मात करता येईल महात्मा गांधी नी दिलेल्या संदेशाप्रमाणे गावाकडे चला गावचा विकास हाच देशाचा विकास या उद्देशाने स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती पुरक व्यावसायाकडे  वळवण्यासाठी शेळी संचाचे वाटप करण्यात आले. तळा तालुक्यातील ७ गावातील ४७ शेतकऱ्यांना शेळी संचाचे वाटप करण्यात आले याबरोबरच शेळी पालन प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले. तसेच मेडिकल किट व खाद्य देखील वाटप करण्यात आले याप्रसंगी स्वदेस फाऊंडेशनचे व्यवस्थापक, स्वदेस प्रतिनिधी व शेतकरी हजर होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा