अर्णब गाेस्वामी विरुद्ध केलेल्या कारवाईचे अझाद हिंद संघटना रायगड कडुन काैतुक माणगांव उपविभागीय पाेलीस अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत.!
किरण शिंदे
संपुर्ण राज्यासह देशात चर्चेचा विषय बनुन राहीलेला रिपब्लिक टिव्ही चे संपादक अर्णब गाेस्वामी यांना रायगड पाेलीस LCB शाखा व मुंबई पाेलीस यांनी ग्रुहखात्याच्या आदेशाप्रमाणे केलेली कारवाई यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकिय वातावरण ढवळुन निघाले, मे 2018 राेजी अर्णब गाेस्वामी यांच्याविरुध्द् अलिबाग तालुक्यातील वास्तुविशारद (इंटेरीयर डेकाेरेटर) अन्वय नाईक यांच्या व त्यांच्या आई च्या म्रुत्युप्रकरणी अर्णब गाेस्वामी यांना 4 नाेव्हें राेजी अटक केली यामध्ये माणगांव पाेलीस उपविभागीय अधिकारी प्रविण पाटील यांचा देखील खारीचा वाटा असल्यामुळे तसेच राज्यसरकारने केलेल्या कारवाईचे काैतुक म्हणुन तसेच पाेलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईचे काैतुक म्हणुन आझाद हिंद संघटना महाराष्ट्र राज्य च्या रायगड जिल्हा संघटनेकडुन माणगांव उपविभागीय अधिकारी प्रविण पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच घाेषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी आझाद हिंद संघटनेचे राज्यअध्यक्ष अँड सतिषचंद्र राेठे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद झाेरे ,जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, माणगांव तालुकाध्यक्ष संदेश पवार, महाड तालुकाध्यक्ष जय़ेश लामजे, काेंडीराम काेकरे, दगडु सुतार, रंजित कदम, निरज जगताप, श्रारंग पवार, राकेश पवार, आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.
राज्यसरकार आणि महाराष्ट्र पाेलीस लाेकल क्राईम ब्रांच रायगड शाखा यांनी केलेली केलेली कार्यवाही काैतुकास्पद आहे याकरीता पाेलीस अधिकारी आणि राज्यसरकार यांच्यावर कितीही स्तुतीसुमने उधळली तरी कमीच आहेत, आमच्या संघटनेचे राज्यअध्यक्ष अँड सतिषचंद्र राेठे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईचे काैतुक आम्ही फटाक्यांच्या आतषबाजीने करणार हाेताे मात्र न्यायलयाचा आदेश पाळत आम्ही पुष्पगुच्छ देऊन पाेलीस व राज्यसरकारच्या कार्याचे काैतुक केले आहे.
श्री रामचंद्र झाेरे, रायगड जिल्हाध्यक्ष आझाद हिंद संघटना.
Post a Comment