शिवसेना नेते विकासच विसरले आहेत ते, हे सरकार फार काळ टिकणार नाही - कृष्णा कोबनाक


राज्यात सरकार असून ही शिवसैनिक नाराज ....काय हि अवस्था ; कृष्णा कोबनाक
बाबू शिर्के : म्हसळा (वार्ताहर)
 म्हसळा तालुक्यात शिवसेनेकडून मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला अल्प प्रतिसाद मिळाला.  राज्यात सरकार असून ही शिवसैनिक निराश. राज्यात सत्ता मिळावी म्हणून एकत्रित व मतदारसंघात एकला चला रे? काय ही शिवसेनेची अवस्था.अशी खरमरीत टीका भाजप चे रायगड जिल्ह्याचे नेते कृष्णा कोबनाक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली. महा विकास आघाडी सरकार हे जनतेच्या भल्या साठी स्थापन झाले नसून सर्व भ्रष्टाचारी नेते एकत्रित येऊन आपली प्रकरणेही भविष्यात बाहेर येऊ नयेत म्हणून राजकीय आश्रय घेण्यासाठी एकत्र आले आहेत.शिवसेने कडून विकास कामांची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. शिवसेना नेते विकासच विसरले आहेत ते, हे सरकार फार काळ टिकणार  नाही, लवकरच आप आपसात भांडणे करुन पडणार आहे. स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टी सोबत म्हणजे आमच्या पक्षा सोबत फारकत घेऊन राज्यात अनैतिक सरकार स्थापन केले ते जनतेला आजिबात आवडले नाही. 
हे सरकार आल्यापासून महाराष्ट्राची अधोगती सुरू झाली आहे. अनेक विकास कामांना अडथळे  निर्माण केली आहेत.तीन ती़घडा कामकाज बिघाडामुळे जनता त्रस्त आहे. स्वता शिवसैनिक बोलत आहेत की लोकांनी त्याना गावात बंदी केली आहे ,कारण हे काहीच करु शकत नाही. म्हसळा तालुक्यात मागील १० वर्षे काहीही विकास कामे केली नसून कोणत्या तोंडाने नगरपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती  निवडणूका लढणार? स्वता त्यांचे शिवसैनिक बोलत आहेत.  आता  या तालुक्यात फक्त शतप्रतिशत भारतीय जनता पार्टी च या तालुक्यात विकास करणार या बाबतीत जनतेला विश्वास झाले आहे. मागील पाच वर्षे भाजपा सरकार मधून आम्ही खूप कामे केली आहेत. मुख्य मंत्री ग्रामसडक योजना, इजिमा रस्ते प्रजिमा करुन रस्ते सुधारणा, राष्ट्रीय पेयजल योजना अनेक गावात सामाजिक सभागृह, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीबांना घरे, वीज कनेक्शन, गॅस योजना, शेतकरी सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना, महीला बचत गट, निराधार योजना अशा योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले आहे. निसर्ग चक्रीवादळ व करोना महामारी मध्ये केंद्र सरकारने रेशनिंग व अन्य मदत दिली आहे पण महा विकास आघाडी सरकारने काय दिले?  अश्या अनेक टीका  कृष्णा कोबनाक यांनी प्रसिद्धी पत्रा द्वारे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा