संजय खांबेटे : म्हसळा
जून महिन्यात निसर्ग नामक चक्रीवादळामुळे संसार उध्वस्त झालेल्या रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना त्यांचे हक्काचे घर मिळाले.वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र आणि प्रतिबिंब न्यास, मुंबई यांनी श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात राहणाऱ्या कातकरी समाजातील 16 बांधवांना सामूहिक वास्तू पूजन करून नवीन घरे हस्तांतरित केली.
' 1 नोव्हेंबर 2020 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सोमैय्या जुलू आणि प्रतिबिंब न्यासाचे श्री नरेश पडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थानिक नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या हृदयंगम सोहळ्यात 16 कुटुंबीयांनी आपल्या हक्काच्या घरात प्रवेश केला.या वादळाने ओढवलेली आपत्ती आणि विनाश भयंकर आहे. अजून अनेक गावे आहेत ज्यांना सर्वर्थाने पुन्हा वसविण्या साठी त्वरित मदतीची गरज आहे. शासन जे करेल ते करेल पण आपल्या आदिवासी बांधवांना असे वाऱ्यावर सोडून चालणार नाही ह्या उदात्त हेतू ने वनवासी कल्याण आश्रमाने हे कार्य तडीस नेवून खारीचा वाटा उचलला आहे". असे प्रतिपादन मुख्य अतिथी श्री सोमय्या जुलू यांनी या प्रसंगी केले.
बरोबरीने प्रमुख पाहुणे आणि या पुनर्निर्माणाचे आर्थिक शिव धनुष्य पेलणारे प्रतिबिंब न्यासाचे संचालक श्री. नरेश पडिया यांनी विशेष गोष्ट सर्वांच्या समोर आणली ती म्हणजे गावातील 16 कुटुंबानी हिम्मत न हारता श्रमदान करून एकमेकांची घरे विक्रमी वेळात बांधून पूर्ण केली. ते भावणावश होवून म्हणाले "त्याचे मोल हे आम्ही केलेल्या मदतीपेक्षा अधिक आनंददायी आणि समाधान देणारे आहे."निसर्ग वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या आणखी 7 वनवासी वाडयां मध्ये एकूण 900 पत्र्यांचे वाटप ही वनवासी कल्याण आश्रमा तर्फे करण्यात आले या माहितीसह या महामारी निमित्त निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीतही आपल्या वंचित जनजाती बांधवांना घरकुल आणि निवारा देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कल्याण आश्रमच्या आवाहानाला प्रतिसाद दिला त्यांचे आभार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांत अध्यक्षा सौ. ठमाताई पवार यांनी मानले.गावातली ही घरे बांधण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला अशा भोस्ते वाडीतील युवकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा सचिव श्री. योगेश बोरसे यांनी केले, कोकण प्रांत सह सचिव श्री विवेक सुर्वे, श्री परशुराम गावित ,श्री श्रीधर कोचरेकर व मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधून वनवासी कल्याण आश्रम मुंबई महानगरा तर्फे प्रतिवर्षी वितरित केली जाणारी दिनदर्शिकाचे ही विमोचन मा सोमय्या जुलू यांच्या हस्ते करण्यात आले. दिनदर्शिकेची विशेषतः वकआश्रम मुंबई महानगराचे सचिव श्री. पंकज पाठक यांनी सांगितली बरोबरीने स्वागत मूल्य रुपये 20 देवून ती लवकरच उपलब्ध होईल असे सांगितले
Post a Comment