म्हसळा -प्रतिनिधी
माहे जानेवारी2020/2021 मध्ये म्हसळा नगर पंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण होत आसुन सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार प्रभाग रचना, मतदार नोंदणी,मतदार यादीतील नाव दुरुस्ती किंवा कमी करणे,आरक्षण सोडत आदी कामांना गती मिळाली आहे. आज दिनांक 27/11/2020 रोजी म्हसळा नगर पंचायत समितीचे नव्याने आरक्षण सोडतीत जुन्या प्रभागांचे क्रमांक दिशानिहाय बदलण्यात आले आहेत तर 17 प्रभागांमध्ये महिला लोकसंख्याच्या प्रमाणानुसार 9 प्रभागात महिला आरक्षण राखीव ठेवण्यात आले असल्याचे निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा प्रांताधिकारी अमित शेडगे,मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी माहिती देताना सांगितले.कन्या शाळेच्या सभागृहात आयोजित आरक्षण सोडतीत प्रभाग निहाय आरक्षण काढताना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मागील वर्षी ज्या वार्डात महिला आरक्षण होते ते वगळून नव्याने नवीन वार्डात स्त्रियांना राखीव जागेवर चिट्ठी काडुन आरक्षित करण्यात आले.महिलांसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक 1 अनुसुचित जमाती महिला, प्रभाग क्रमांक 4 अनुसुचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 8,9,10,11,15 आणि 17 या सहा प्रभागांत सर्वसाधारण महिला आणि प्रभाग क्रमांक 13 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग असे 9 प्रभाग महिलांना आरक्षित आहेत तर उर्वरीत 8 प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक 2,3,6,7 नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी),प्रभाग क्रमांक 5,12,14,16 मध्ये सर्वसाधारण जागेकरिता सोडत पध्द्तीने आरक्षित झाल्याचे प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी सोप्या पद्धतीने सांगितले.या वेळी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व हितचिंतक उपस्थित होते.नवीन आरक्षण पद्धती व प्रभागांचे क्रमांक बदला नुसार अनेक विद्यमान नगरसेवकांचे त्यांचे हक्काचे प्रभाग रद्दबातल झाल्याने होणाऱ्या पुढील निवडणूकित निवडणूक तिकीट आपोआपच कट झाले असल्याने नाराजी व्यक्त होताना दिसली, तर अनेकांसाठी आयती संधी चालून आली आहे.अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीचे सोडतीत स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटला आहे.ज्या ठिकाणी अनु.जाती व जमातीचे नागरिक वास्तव्य करतात त्या प्रभागात सोडत पध्दतीने काढलेले आरक्षण न पडता ते अल्पसंख्याक समाजाची लोकवस्ती असलेल्या प्रभागात महिलांसाठी राखीव आरक्षण झाले असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Post a Comment