म्हसळा शहरातील सामाजिक व धडाडीचे नेतृत्व असणारे संतोष पानसरे भाजपात दाखल



( म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा शहरातील हिंदू समाजातील युवा नेतृत्व संतोष पानसरे हे आज भाजपात दाखल झाले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार श्री प्रशांत ठाकूर, भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड श्री महेश मोहिते यांच्या उपस्थितीत पानसरे यानी अलिबाग येथे पक्षप्रवेश केला.या प्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक भाजपा नेते श्री कृष्णा कोबनाक, तालुका अध्यक्ष श्री प्रकाश रायकर, सरचिटणीस श्री महेश पाटील, सरचिटणीस श्री सुनील शिंदे, चिटणीस श्री दिलीप कोबनाक अनिल टिंगरे, मनोहर जाधव, उपस्थित होते. आगामी म्हसळा नगरपंचायत निवडणूक करिता शहराची जबाबदारी म्हणून संतोष पानसरे यांची शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
संतोष पानसरे यांचा ज्वलंत हिंदूत्ववादी कार्यकर्ता म्हणून म्हसळा शहरांत व तालुक्यांत दबदबा आहे. पानसरे हे सध्या रायगड रिक्षा युनियनच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी कार्यरत आहेत.भाजपा विस्तार साठी त्यांची चांगली मदत होणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शन खाली शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी त्याना पाठबळ मिळणार आहे. शहरातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पानसरे यांच्या प्रवेश व निवडी बद्दल अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा