रोहा (निखिल दाते)
रायगड जिल्ह्यातील विज वितरण कंपनीच्या संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री ना.श्री.प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत रायगडवासियांच्या व्यथा मांडून त्यावर योग्य तोडगा काढण्याच्या द्रुष्टीने सकारात्मक पावले उचलली.
सदर बैठकीत कोरोनाकाळात महावितरणने ग्राहकांना भरमसाठ आकारलेली विजबिले , तसेच लॅाकडाऊन काळात विजेचा वापर कमी असतांना देखील शाळा, कॅालेज यांची वाढीव आलेली बिले याबाबींचा सहानुभूतीपुर्वक विचार करून सदरची वीजबिले ग्राहकांना पाच टप्प्यांत भरण्याची सवलत मिळावी अशी विनंती केली. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील वीजबिलांच्या तक्रारीसंबंधी समस्या सोडविण्यासाठी अधिक शिबीरे आयोजित करण्यात यावी, अशी मागणी देखील ना. आदिती तटकरे यांनी केली.
यावेळी रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे व ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी सकारात्मक चर्चा करून रायगड मधील महावितरण संबंधी सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या द्रुष्टीने आवश्यक त्या सुचना संबंधित आधिकाऱ्यांना दिल्या.
Post a Comment