म्हसळा शहर काँग्रेस (आय) महीला आघाडीचा पाण्यासाठी नगरपंचायतीवर हंडा व बांगडी मोर्चा



(म्हसळा प्रतिनिधी)
नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 9 व वार्ड क्रमांक 14 मध्ये नगरपंचायत मार्फत होणारा पाणीपुरवठा हा सतत अपुरा मनमानी,अनियमीतत व दूषित पद्धतीने होत असतो, याच परिसरात असणारी साठवण टाकी ही प्रचंड अस्वच्छ असते यामध्ये नगरपंचायतीने तात्काळ सुधारणा करून त्या भागातील गोरगरीब नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व टाकी परिसरांत रोजच्या रोज स्वच्छता व्हावी या मागणीसाठी काँग्रेस(आय) च्या महिला अध्यक्षा श्रीमती नाझिमा मुकादम, आरती पेडणेकर यानी आज नगरपंचायतीवर हांडा व बांगडयांचा मोर्चा नेला होता यामध्ये शमीम काजी, अनिता चव्हाण, गंगू चव्हाण, शरीफा साने व अन्य इदगा पारसरांतील महिला वर्ग सामिल होता. पावसाळ्यासह गेले अनेक महीने स्वच्छ व पीण्यास योग्य पिण्याचे पाण्याची मागणी करूनही नगरपंचायतीचे Ceo व नगराध्यक्ष योग्य कारवाई करीत नसल्याने निवेदने, उपोषण यानंतर आता हंडा व बांगडी भरो आंदोलन छेडावे लागत आसल्याचे शहर काँग्रेस अध्यक्षा नाझीमा मुकादम यानी सांगितले.
पाण्यासाठी मोर्चाची कोरडया घशाने झाली सांगता
रायगड जिल्ह्यामध्ये कोरानाचे महामारी मुळे १९७३चे कलम १४४ (१) (३) आसल्याने उल्लंघन करू नये असे आदेश मोर्चेकऱ्याना पोलीसानी बजावले होते त्यामुळे मुकादम- पेडणेकर व अन्य माहिलाना हंडे व Ceoय्यां निषेधासाठी आणलेले साहीत्याविना प्रातीनिधीक स्वरूपाची भेट घेऊन कोरडया घशाने परत यावे लागले.
यावेळी नगरपंचायत प्रशासन झाले होते हतबल
शहरांतील वॉर्ड क्रं ९ व १४ चा पाणी पुरवठा व स्वच्छतेचा प्रश्नाबाबत Ceo ऊर्कीर्डे यानी कोणताच ठोस निर्णय न घेता कारकून व नळफीटर फरहान साने जुजबी उत्तरे देत आसल्याने तर Ceo ऊर्कीर्डे यानी ग्रा.पा.पु. उपविभाग म्हसळा यानी बेलदारवाडीची नळ योजना तब्बल ९-१० वर्ष होऊनही नगरपंचायतीच्या ताब्यात नसल्याने आम्ही तूर्त काहीच करू शकणार नाही असे उत्तर देऊन प्रशासन हतबल झाले.



"वाढीव घरपट्टी, पाणीपट्टी , अस्वच्छता नगरपंचायत प्रशासनाचा प्रचंड भ्रष्टाचार या विरूध्द संपूर्ण म्हसळा शहरांत आंदोलन छेडले जाईल"
नाझीमा मुकादम , शहर अध्यक्षा, (काँग्रेस आय)




Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा