आरोग्यवर्धीनी केंद्र लोणेरे बंद असल्याने उपचारासाठी स्थानिकांची गैरसोय !


आरोग्यवर्धीनी केंद्र लोणेरे बंद असल्याने उपचारासाठी स्थानिकांची गैरसोय ! 

किरण शिंदे

आरोग्यवर्धीनी केंद्र लोणेरे कित्तेक दिवसापासून बंद असल्याने उसरघर, लोणेरे तसेच आजुबाजूच्या परीसरातील लोकांना माणगाव येथे उपचारासाठी धावपळ करावी लागते! 
लोणेरे - उसरघर परिसरातील स्थानिक लोकांना तसेच मुलांना लसीकरण उपचारासाठी माणगाव येथे जावे लागत होते. यात पैसा व वेळ वाया जात होता. स्थानिकांना लवकरात लवकर उपचार तसेच लहान मुलांना लसीकरण जवळच उपलब्ध व्हावे म्हणून आरोग्यवर्धीनी केंद्र लोणेरे हे उसरघर येथे बांधण्यात आले. परंतू कित्तेक दिवस केंद्र बंद असलेल्या स्थानिक लोकांची गैरसोय होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लहान मुलांना माणगाव येथे लस तसेच डोस देण्यासाठी माता घाबरत असल्याने लवकरात लवकर केंद्र चालू करूण्यासाठी स्थानिक मागणी करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा