दिवाळीचा फराळ बनविण्यासाठी महीलांची लगबग.



तळा (किशोर पितळे)हिंदू धर्मात दिपावली अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील अधःकार नाहिसा होऊन प्रकाशमय व्हावा.तसेच भगवान श्रीकृष्ण यांनी
नरकासुराचा वध करून अलंकापूरी मुक्त केली.त्या नगरीत आनंदी आनंदाने नांदू लागल्या असा पौराणिक कथेत उल्लेख आहे.त्याचाच एक भाग म्हणून पत्नी पाडव्याच्या दिवशी दिव्याने औक्षण करते तसेच भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणी कडे जाऊन बहिण
भावाचे औक्षण करते.याआनंददायी सणाच्या तयारीत घरोघरी महिलावर्ग फराळ बनविण्यासाठी लगबगसुरू झालेले चित्र पहायला मिळत आहे. खंर तर  नोव्हेंबर पासून सुगीचे दिवस सुरू झालेले असतात.भातशेती
कापून मळणी काढून घरात धन धान्य लक्ष्मी आलेली असते. तीचे औक्षण पुजा धनत्रयोदशीच्या दिवशी केलेजाते. आघोट हावरी अन् सराई नवरी.म्हणी प्रमाणे व ऋण काढून सण साजरे अशी हिंदु संस्कृती व संस्कारआहेत प्रचंड वाढतीमहागाई, लाँकडाऊन जरी कोरोनासारखेमहामारी,निसर्गचक्रीवादळ,अवेळी पाऊस,निसर्गाच्यालहरीपणामुळे शेतीचे प्रचंडनुकसान झालेले असूनही मात्र आपल्या परीने सण साजरे करण्यात कमी पडत नाहीत निरुत्साही दिसू देत नाहीत.लाडू,करंज्या,शंकरपाळी,चकली,कडबोळी, चिवडा,अशा विविध प्रकारच्या फराळ बनविण्यात महीला वर्ग व्यस्त असलेल्या दिसतआहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा